पाथर्डी, शेवगाव, राहुरी तालुक्यात स्वाभिमान जनसंवाद यात्रेस मोठा प्रतिसाद लाभल्यानंतर
नीलेश लंके यांच्या नगर तालुक्यातील मांजरसुंभा, पिंपळगाव माळवी, डोंगरगण, चाफेवडी, जेऊर, शेंडी,पोखर्डी, बुऱ्हाण नगर, कापूरवाडी, नागरदेवळे, दरेवाडी या भागातील झंझावाती दौऱ्यास उदंड प्रतिसाद लाभला.
शनिवारी मांजरसुंभा गवापासून सुरुवात झाल्यानंतर दरेवाडी येथे लंके यांची यात्रा पोहचेपर्यंत पहाटचे ३ वाजले होते. पहाट झाली तरी जागोजागी शेकडोंच्या संख्येने नागरिक लंके यांची वाट पहात होते. हा परिसर मा. आमदार शिवाजी कर्डीले यांचा बालेकिल्ला मानला जातो. याच भागात लंके यांची सभा झाली, त्यात लंके यांनी घणाघाती टीका केली. त्यास उपस्थित लोकांनी टाळ्या आणि शिट्या वाजवत प्रतिसाद दिल्याचे चित्र पा
पहावयास मिळाले.
यावेळी मविआचे गोविंद मोकाटे, रोहिदास कर्डीले, संदीप कर्डीले, संदेश कार्ले,बाळासाहेब हराळ, शरद झोडगे, उद्धवराव दुसुंगे, भाऊसाहेब काळे,राजेंद्र भगत, रामेश्वर निमसे यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.
विविध गावात झालेल्या गावात झालेल्या सभेत बोलताना लंके म्हणाले, ज्या लोकांनी आजवर दहशत आणि गुंडगिरीच्या जोरावर त् राजकारण केले त्यांची दहशत जनतेनेच मोडून काढली आहे. या भागातून त्यांना जनतेने तडीपार केले आहे. तेच आता माझ्यावर गुंडगिरीचा आरोप करत आहेत.दूध धंदा करणारा माजी आमदार कधी दुधाच्या कमी झालेल्या भावावर बोलला का ? या चोराच्या उलट्या बोंबा!
विरोधकांनी टीका करण्याआगोदर शेतमालाचा कमी झालेला बाजारभाव, कांद्याची निर्यात बंदी आणि त्यामुळे शेतकऱ्यांना बसलेला फटका, दुधाचे कमी झालेले बाजारभाव, उच्च शिक्षण घेऊनही बेरोजगार असणारी तरुण पिढीने बोलले पाहिजे. प्रवरा कारखान्यातील १९१ कोटींच्या घोटाळ्यावर तरुण व्यक्त झाले पाहिजेत.