Tuesday, February 18, 2025

मुंडे साहेेबांवरील निष्ठेपायी लंके यांनी फोटो लावला,नीलेश लंके यांच्यासाठी पंकजा मुंडे यांचा सॉफ्ट कॉर्नर !

नगर : प्रतिनिधी शेवगाव येथे पार पडलेल्या शरद पवार यांच्या सभेच्या बॅनरवर स्व. गोपीनाथ मुंडे यांच्यासह इतर दिवंगत नेत्यांची छायाचित्रे लावण्यात आली होती. त्यावरून विशेषतः भाजपा कार्यकर्त्यांकडून अक्षेप घेतले जात असताना स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या तथा बीड मतदारसंघातील भाजपाच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी मात्र लंके यांच्यासाठी सॉफ्ट कॉर्नर घेत मुंडे साहेबांवरील निष्ठेपायी त्यांनी तो फोटो लावल्याची भुमीका घेतली आहे.

महाविकास आघाडीचे नगर दक्षिण मतदारसंघातील उमेदवार नीलेश लंके यांनी गोपीनाथ मुंंडे यांचे छायाचित्र बॅनरवर लावून प्रचार सुरू केला असल्याचे पत्रकारांनी निदर्शनास आणून दिले असता पंकजा मुंडे म्हणाल्या, मुंडे साहेब आज नाहीत. त्यांच्यावर श्रध्दा, प्रेम किंवा निष्ठा असणारे लोकं जर कोणी त्यांचे छायाचित्र लावत असतील तर मी त्याला नाही म्हणू शकत नाही. आम्हीही बाळासाहेब ठाकरे यांचे छायाचित्र फलकावर लावले आहे. हे नाते कायम राहिल अशी प्रतिक्रिया मुंंडे यांनी दिली.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles