Saturday, May 18, 2024

लोकसभा मतदान संपताचं निलेश लंके अँक्शन मोडवर केले ‘हे’ अवहान

माझ्या प्रिय शेतकरी बांधवांनो मागील महिन्यात मी दिलेल्या शब्दाप्रमाणे मतदान झाले की १५ तारखेला म्हणजेच आज आपण कांदा आणि दूध दरवाढी संदर्भात भव्य आंदोलन करू असा शब्द दिला होता कारण, सध्या शेतकरी बांधवांच्या या जीवनावश्यक प्रश्नासाठी भव्य आंदोलन उभा करण्याची गरज आहे!
पण सध्या लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता अजूनही लागू असल्याने, मी जिल्हाधिकारी, अहमदनगर यांना निवेदन देण्यासाठी आज दुपारी ३वा( तीन )वाजता महाविकास आघाडीच्या नेतेमंडळी सोबत येणार आहेत तसेच कांदा आणि दूध दरवाढीची मागणी करणार आहे.

बाकी आंदोलनाशिवाय या प्रशासनाला आणि सरकारलाही जाग येणार नाही. आंदोलनाची दिशा आणि धोरण आचारसंहिता संपली की ठरवू आणि एकत्रित मिळून एक व्यापक लढा उभारू, आपण कुणीही नगर येथे येऊ नये आपल्याला आंदोलनाची पुढील तारीख आणि वेळ कळविली जाईल
धन्यवाद!
आपला..
निलेश ज्ञानदेव लंके

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles