अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून भाजप उमेदवार सुजय विखे यांचा पराभव करून निलेश लंके पहिल्यांदाच खासदार म्हणून निवडून आले आहेत.
यातच आज शरद पवार गटाच्या मेळाव्यात काॅलर उडवून त्यांनी आपला आनंद व्यक्त केला आहे. यावेळी बोलताना निलेश लंके म्हणाले की, ”ये तो ट्रेलर है, विधानसभा अभी बाकी है. नाद करायचा, मात्र पवारसाहेबांच्या नाही.”