Monday, July 22, 2024

लंकेंच्या विजयानंतर संत बाळूमांमांची नवसपूर्ती !काठी, घोंगडी, फुले व प्रसाद देत केला सन्मान

लंकेंच्या विजयानंतर संत बाळूमांमांची नवसपूर्ती !

नवसपूर्तीनंतर कोल्हापुरकर खा. लंके यांच्या भेटीला

काठी, घोंगडी, फुले व प्रसाद देत केला सन्मान

नगर : नीलेश लंके लोकसभेच्या निवडणूकीत विजयी व्हावेत यासाठी संत बाळूमामांकडे केलेल्या नवसाची पुर्ती कोल्हापुर जिल्हयाच्या कागल तालुक्यातील शेंडुरचे मा. उपसरपंच तसेच लंके यांचे चाहते निखिल निंबाळकर चाहत्याने केली. नवसपूर्तीनंतर निंबाळकर यांनी नगर येथे येत खा. लंके यांचा काठी, घोंगडी, बाळूमामांच्या समाधीवरील फुले तसेच प्रसाद देउन सन्मानही केला.
नीलेश लंके यांचा चाहता वर्ग संपूर्ण महाराष्ट्रभर असून लंके लोकसभा निवडणूकीच्या रिंगणात उतरल्यानंतर अनेकांनी त्यांच्या विजयासाठी नवस केले होते. त्यापैकीच एक निखिल निंबाळकर यांनी संत बाळूमामांकडे केलेल्या नवसाची पुर्तता केली आहे.
आदमपुर येथे संत बाळूमामांचा नवसपूर्ती केल्यानंतर निंबाळकर हे नगरमध्ये आले. लंके यांच्या भेटीनंतर त्यांना गहिवरून आले.निंबाळकर यांच्यासोबत आलेेले लक्ष्मण गोरडे, संजय निंबाळकर, शंकर पोवार हे लंके यांच्या भोवती असलेला माणसांचा गराडा पाहून अचंबित झाले. माणसांच्या गर्दीतूनही कोल्हापुरकरांना ओळख देत लंके यांनी त्यांना वेळ देऊन त्यांचा सन्मान स्विकारला.
खासदारसाहेबांनी आमचे विशेष आभार माणल्याचे सांगत त्यांनी दिलेले प्रेम, आपुलकी आमच्या मनाला समाधान देऊन गेले.आमच्यासारख्या सामन्य माणसांकडे खूप सारी गर्दी असतानाही त्यांचे आमच्याकडे लक्ष होते हा त्यांचा गुण आम्हाला भावला. या प्रसंगामुळे आमचे खा. लंके यांच्यावरील प्रेम व्दिगुणीत झाल्याच्या भावना कोल्हापुरकरांनी व्यक्त केल्या. लंके यांचे सहकारी अशोक तथा बबलूशेठ रोहोकले यांच्याप्रतीही त्यांनी कृतज्ञता व्यक्त केल्या.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles