Monday, February 17, 2025

शिबिराच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिक, महिला, पुरुष, मुलांना नवी दृष्टी देण्याचे काम खा. निलेश लंके

गोरगरीबांची सेवा करणे हीच खरी ईश्वरसेवा खासदार निलेश लंके
पाईपलाईन रोडवरील सप्तश्रृंगी कॉलनीत श्री दत्त मंदिरात मोफत शिबिरास उस्फूत प्रतिसाद

नगर प्रतिनिधी सामाजिक भान ठेवून नगरसेवक योगिराज गाडे करत असलेला उपक्रम नगर जिल्हा व शहरासाठी अभिमानास्पद बाब आहे. समाजातील प्रत्येक घटकाला योग्य ती सेवा दिली जात आहे. जे कार्य केले जाते पूर्ण श्रध्देने व निष्ठेने केले जात आहे. या कार्यात आम्हासही सहभागी करुन घेत असल्याने सुख-समाधान-शांती लाभत असल्याचे त्यांनी सांगितले समाजातील दु:ख निवारण्याचे काम या माध्यमातून करीत आहे. समाजातील दीनदुबळ्या, गोरगरिबांची सेवा करणे हीच ईश्वर सेवा आहे. असे प्रतिपादन खासदार निलेश लंके यांनी केले.

पाईपलाईन रोडवरील सप्तश्रृंगी कॉलनीत श्री दत्त मंदिरातशिवसेना नगर शहर, निलेश लंके प्रतिष्ठान, विक्रम राठोड, नगरसेवक योगिराज गाडे , थोरात आय केअर आणि अंजली चष्मा वाला यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी व नंबरचे चष्मा वाटप प्रसंगी खासदार निलेश लंके, नगरसेवक योगिराज गाडे, रावजी नांगरे, सुरेश क्षीरसागर, अशोक दहिफळे, प्रमोद वारूळे, सांगळे, अभिजित अष्टेकर, प्रशांत पाटील,संजय आव्हाड,गणेश रोडे,संजय बुलबुले,दीपक आडेप,रोहिदास कडूस,शिवाजी आडोळे आदी मान्यवर उपस्थित होते.

खासदार निलेश लंके म्हणाले या शिबिरातून अनेक ज्येष्ठ नागरिक, महिला, पुरुष, मुलांना नवी दृष्टी देण्याचे काम होत आहे.असे शिबिरे लवकरच जिल्हाभर घेण्याचा मानस यावेळी लंकेनी व्यक्त केला.

योगिराज गाडे म्हणाले शिबिराच्या माध्यमातून हजारो रूग्णांना यांचा लाभ मिळत आहे सामाजिक भावनेतून हे शिबिर होत आहे पैश्याअभावी आज सामान्य नागरिक तपासणी करत नाही त्यामुळे मोफत नेत्र तपासणी करून रूग्णाना चष्मे देण्यात येत आहे यामुळे नागरिकांच्या चेहऱ्यावर मिळणारा आनंद हा मनाला समाधान देणार आहे.

महेश धनगर ,राज गोरे,वैभव सांगळे,हषइ आणेचा,प्रथमेश महिंद्रकर,ओम पाले,प्रसाद खंदारे,रोहन खंडागळे आदीसह परीसरातील नागरिकांनी शिबिराकरीता प्रयत्न केले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles