Saturday, May 18, 2024

कल्याण रोडवर युवक व कुटुंबाला मारहाण, निलेश लंके म्हणाले, आमचा काही संबंध नाही

नगर शहरातील शिवाजीनगर परिसरात प्रचार फेरी दरम्यान एका कुटुंबाला सर्व जणांना मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. ही मारहाण निलेश लंके यांच्या कार्यकर्त्यांकडून झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. प्रचार फेरी सुरू असताना गाडीला रस्ता देण्यासाठी विनंती केली असता ही मारहाण केल्याचं म्हटलं जात आहे.
या घटनेत एक वृद्ध महिला जखमी झाली असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र या घटनेवरून शहरातील राजकारण चांगलंच तापलं आहे. भाजप उमेदवार सुजय विखे आणि मविआचे उमेदवार निलेश लंके यांनी एकमेकांवर आरोप – प्रत्यारोप केले आहेत. शहरातील या मारहाणीशी आमचा कोणताही संबंध नसल्याचं निलेश लंके यांनी म्हटलं आहे. आम्हालाच त्रास देऊन पुन्हा आमच्यावर आरोप करतात असं लंके यांनी म्हटलं आहे. तसंच पोलिस आणि महसूल विभागाचा वापर करून आमच्या कार्यकर्त्यांना त्रास देत असल्याचा आरोप लंके यांनी केला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles