Home नगर जिल्हा खासदार निलेश लंके यांच्या समर्थकांवर हल्ला प्रकरणी मोठी अपडेट,१२ जणांविरूद्ध…

खासदार निलेश लंके यांच्या समर्थकांवर हल्ला प्रकरणी मोठी अपडेट,१२ जणांविरूद्ध…

0

खासदार निलेश लंके यांचे समर्थक राहुल झावरे यांना काल (६ जून) पारनेर शहरातील आंबेडकर चौकात मारहाण झाली आहे. या प्रकरणी १२ आरोपींविरोधात पारनेर पोलिसांत भादवि कलम ३०७ आणि इतर कलमासह आर्म ऍक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राहुल झावरे यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल झाला आहे. काल दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास राहुल झावरे यांच्या वाहनाची तोडफोड करत त्यांना जबर मारहाण करण्यात आली होती. या घटनेनंतर राहुल झावरे यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांना नगर शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं

दरम्यान पोलिसांनी आरोपी विजय औटी, नंदू औटी आणि इतर एकाला ताब्यात घेतले होतं. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. राहुल झावरे यांना मारहाण केल्याप्रकरणी विजय औटी, नंदू औटी, प्रितेश पानमंद, अंकुश ठुबे, निलेश घुमटकर, संगम सोनवणे, नामदेव औटी, मंगेश कावरे, पवन औटी, प्रमोद रोहकले, प्रथमेश रोहकले, सुरेश औटी आणि इतर ३ ते ४ अनोळखी व्यक्तींविरोधात पारनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस याप्रकरणी पुढील तपास करीत आहेत.