नगर लोकसभा मतदारसंघात
नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात
माजी आमदार निलेश लंके यांच्या नगर दक्षिण स्वाभिमान जनसंवाद यात्रेला म्हसे येथे भव्य प्रतिसाद मिळाला. यावेळी संवाद साधताना लंके म्हणाले, ज्येष्ठ वडीलधाऱ्या नागरिकांचा कार्यकर्त्यांचा उत्साह सर्वांना ऊर्जा देणारा आहे.
केंद्रातील सरकार शेतकऱ्यांचे मारेकरी आहे, देशात विक्रमी उत्पादन होत असताना शेतकऱ्यांवर अन्याय करणारे निर्णय घेऊन केंद्र सरकारने शेतकऱ्याचे कंबरडे मोडले. अशा काळात आपल्या मायबाप जनतेचे स्वप्न संसदेत मांडण्याचे सोडून विद्यमान खासदार आपल्या उमेदवारीसाठी सरकारच्या पायाशी लोटांगण घालत होते.
हे चित्र आपल्याला बदलायचं आहे, मला प्रत्येक दिवस प्रत्येक क्षण माझ्या मायबाप जनतेसाठी काम करायचं आहे. आम्हाला मिळणारा प्रतिसाद पाहता नगर दक्षिणमध्ये परिवर्तन अटळ आहे.