Wednesday, April 17, 2024

राम शिंदेंशी जवळीक निलेश लंकेंसाठी अडचणीची ?… आमदार रोहित पवार अंतर राखून…

आपल्या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी माजी आमदार नीलेश लंके कार्यकर्ते घेऊन पुण्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यालयात आले होते. त्यावेळी शरद पवारांच्या हस्ते लंकेंच्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. त्या आधी पत्रकार परिषददेखील झाली. मात्र, या कार्यक्रमाला रोहित पवार उपस्थित नव्हते. त्यामुळे रोहित पवार कुठे आहेत, याची कुजबुज कार्यकर्त्यांमध्ये सुरू होती.

कर्जतमध्ये राम शिंदे हे रोहित पवारांचे विरोधक आहेत. त्यांना पराभूत करत रोहित पवारांनी विधानसभा जिंकली. राम शिंदे यांना भाजपकडून विधान परिषदेवर घेतले. राम शिंदे विधान परिषेदवर आल्यानंतर त्यांच्यात आणि नीलेश लंकेंमध्ये जवळीक वाढल्याच्या चर्चा आहेत. लंके यांच्या अनेक कार्यक्रमांना राम शिंदेंनी हजेरी लावलेली आहे. त्यामुळेच रोहित पवार हे लंकेंवर नाराज असल्याच्या चर्चा आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles