Tuesday, April 23, 2024

13 तारखेला कळेल डाॅन कोण आहे ते! रावणाच्या अहंकाराचा देखील नाश झाला. तुम्ही कोण?

रावणाच्या अहंकाराचा देखील नाश झाला. तुम्ही कोण?
‘कम से काम दोन लाख…’ मतांनी निवडून येणारच…!
इथल्या सर्वशक्तीमान सत्ताधाऱ्यांना हरवायचं असेल तर त्याआधी आपल्याला कटू निर्णय घ्यावा लागेल. आमदारकीचा #राजीनामा देताना मला खूप वेदना होतायेत, जनतेने मला माफ करावे.
पुढचे लोक श्रीमंत आहे. हेलिकाॅप्टरने फिरणारे हे लोक आहे. साडेचार वर्षे दिसली नाहीत. या निवडणुकीत आता काहीही होईल, पण आपण मॅनेज होणार नाही. कार्यकर्तेदेखील मॅनेज होणार नाही. मैं हू डाॅन.. म्हणतात, त्यांना 13 तारखेला कळेल डाॅन कोण आहे ते! हे नगर दक्षिणचे खासदार.पंतप्रधान आले उत्तरेला. संरक्षणमंत्री आले उत्तरेला. शासन आपल्या दारी उत्तरेला. अमित शाह आले उत्तरेला. पशुसंवर्धनचे प्रदर्शन घेतले उत्तरेला. जिल्हा नियोजनचा निधी उत्तरेला. पाचशे कोटी निधी राहात्याला. पारनेरचे पत्र आल्यावर अधिकाऱ्यावर डाफरायचे, असे कोठे होत असते का? म्हणून ही निवडणूक कोणत्याही परिस्थितीत लढायची आणि जिंकायचीच.
तु्म्हाला येत्या १३ तारखेला घरी पाठवणार. मी सामान्य कुटुंबातील आहे. मला आणि माझ्या कार्यकर्त्यांना जाणीवपूर्वक त्रास देण्याचे काम केले. मी पैसे नव्हे लाख मोलाची माणसं कमवली. त्यांच्याकडच्या पीएला पीए आहेत. लोकांसाठी मला काम करायचे आहे. मी कार्यकर्ताच राहणार. उद्याही कार्यकर्ता राहणार. ही निवडणूक नगर- दक्षिणच्या अस्मितेची आणि अस्तित्वाची लढाई आहे.
मतदार संघासाठी एकही मोठा प्रोजेक्ट आणला नाही ५० वर्षे या कुटुंबांनी सत्ता उपभोगली व त्यातून मलिदा कमावला. यांची मेडिकल कॉलेज काढली आणि सरकारी दवाखान्याची दुरवस्था केली हे मोठं पाप आहे. यातून कमावलेल्या आर्थिक ताकदीच्या जीवावर लोकांना भरडण्याचे काम हे करत आहेत आणि आजही आर्थिक सक्षम उमेदवार म्हणून बतवण्या करून पैशाच्या जीवावर काहीही करू शकतो हेच वारंवार सांगत आहेत पण आता निवडणूक लोकांनी हातात घेतली आहे.
दुसऱ्याच्या झेंड्यावर आम्ही पंढरपूर करणारी औलाद नाही, दलित सुधारणा योजनेचे ग्रामपंचायत अधिपत्याखाली असलेल्या मंजूर कामांचे श्रेयसुद्धा यांनी घेतले.शेतकऱ्याचा सुपुत्र म्हणून लोकसभेत काम करता. एकदा तरी लोकसभेत शेतकऱ्यांविषयी भाषण केले आहे का? साकळाई, ताजनापूर पाणी योजना कशी बारगळली त्यावर यांचे कसे राजकारण सुरू आहे, हे सर्वांनाच माहीत आहे. कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निमित्ताने अमित शाह यांची भेट घेतली. पुढे काय झालं हे सर्वांना माहीत आहे.
तेव्हा आता राजा का बेटा राजा नही रहेगा..!!
त्यामुळे आता जनताच तुम्हाला तुमची जागा दाखवून देणार.

-माजी आ.निलेश लंके

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles