Monday, March 4, 2024

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा वाढदिवस, नगर तालुक्यात विद्यार्थ्यांना 20 हजार वह्या…

नगर – मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकारच्यावतीने सर्वसामान्यांना विविध योजनांचा माध्यमातून न्याय देण्यात येत आहे. समाजातील सर्व घटकांना बरोबर घेत त्यांच्या उन्नत्तीसाठी काम करत आहेत. त्यामुळे त्यांचा वाढदिवस हा सामाजिक उपक्रमातून साजरा केला जात आहे. शिक्षण घेतांना विद्यार्थ्यांना अडचणी येऊ नये यासाठी शासनाच्यावतीने विविध उपाय योजना राबविण्यात येत आहे. अनावश्यक खर्चाला फाटा देत युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक व सचिव किरण साळी यांच्या सुचने नुसार आज मोफत वह्यांची छोटीशी मदत दिली आहे. या उपक्रमातून जिल्ह्यात सुमारे 20 हजार वह्या विविध शाळांतून राबविण्यात येत आहे. असेच उपक्रम राबविण्यात येईल, असे प्रतिपादन अभिषेक भोसले यांनी सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त युवा सेनेच्यावतीने नगर तालुक्यातील विविध शाळांमध्ये मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी युवा सेना जिल्हाप्रमुख अभिषेक भोसले, युवा सेना नगर -पारनेर विधानसभा प्रमुख कैलास लांडे, ज्येष्ठ नेते रावसाहेब पाटील शेळके, उद्योजक मयुरशेठ निमसे, अशोक निमसे व ग्रामस्थ उपस्थित होते.

याप्रसंगी कैलास लांडे, रावसाहेब शेळके आदिंनी मनोगतातून मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या कार्याचा गौरव करुन युवा सेनेच्या वतीने राबविण्यात आलेल्या उपक्रमांचे कौतुक केले.

युवा सेनेच्यावतीने खारे कर्जुने, हिंगणगाव, इसळक, हमिदपुर आदिं ठिकाणच्या जिल्हा परिषदे शाळांमधील विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles