Home क्राईम न्यूज ऑनर किलिंग गुन्ह्यांमध्ये चार आरोपींना जन्मठेपेची, नगर जिल्ह्यातील घटना…

ऑनर किलिंग गुन्ह्यांमध्ये चार आरोपींना जन्मठेपेची, नगर जिल्ह्यातील घटना…

0
32

ऑनर किलिंग गुन्हयामध्ये चार आरोपींना जन्मठेपेची व दंडांची शिक्षा

‘ अहमदनगर : आरोपी क्र. १ रूपचंद बन्सी बळे, रा कोळगाव ता. जि. अहमदनगर, आरोपी क्र. २ दत्तात्रय लक्ष्मण बळे, आरोपी क्र. ३ ऋषिकेश विष्णु बळे, आरोपी क्र. ४ अनिल रघुनाथ बळे, २ ते ४ रा. निमगाव (मायंबा) ता.शिरूर जि. बीड, आरोपी क्र. ५ मयुर रावसाहब लकारे, रा. गणपती मंदीराजवळ नेवासा ता. नेवासा जि. अहमनगर, आरोपी क्र. ६ उषा रूपचंद बळे, कोळगाव, ता. श्रीगोंदा जि. अहमदनगर या आरोपींनी मयत अमोल सखाराम बळे याचे अपहरण करून त्याचे पोटावर, छातीवर, पाठीवर, हाता-पायावर जबर मारहाण करू त्यास जिवे ठार मारले म्हणून खुनाचे आरोपात दोषी धरून अहमदनगर येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश क्र. २ श्रीमती एम. ए. बरालिया मॅडम यांनी आरोपी क्रमांक १ रूपचंद बन्सी बळे, रा कोळगाव यास भादंवि कलम ३०२ अन्वये जन्मठेप व ५०,०००/- रुपये दंड व दंड न भरल्यास ६ महिने साथी कैद तसेच आरोपी क्रमांक २ ते ४ यांना प्रत्येकी भा.दं.वि. कलम ३०२ अन्वये जन्मठेप व रूपये ४०,०००/- दंड व दंड न भरल्यास ४ महिने साधी कैद, तसेच भा. द. वि. कलम ३६४ सह ३४ अन्वये आरोपी क्र. १ ते ४ यांना ७ वर्षे सश्रम कारावास व प्रत्येकी रुपये १५,०००/- दंड व दंड न भरल्यास ३ महिने साधी कैदेची शिक्षा सुनावली. तसेच आरोपी क.१ च्या दंडाच्या रकमेतून रुपये ४०,०००/- व आरोपी क्र. २ ते ४ यांच्या दंडाच्या रकमेतून रुपये ३०,०००/- हे मयत अमोलच्या आई-वडिलांना नुकसान भरपाई म्हणून देण्याचाही आदेश केलेला आहे. तसेच सर्व शिक्षा हया एकत्रित भोगावयाच्या आहेत. तसेच आरोपी क्रमांक ५ व ६ यांना सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्त केले. सरकार पक्षातर्फे अति. सरकारी अभियोक्ता अॅड. अनिल डी. ढगे यांनी काम पाहिले. त्यांना जिल्हा सरकारी वकील सतीश पाटील यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.

सदर घटनेची थोडक्यात हकिकत अशी कि,
दि. २७.०५.२०१८ रोजी वरील आरोपी क्र. १ ते ७ हे चार अनोळखी इसमासह स्कार्पीओ गाडी घेवून फिर्यादी भाऊसाहेब तुकाराम बळे याचा चुलत भाऊ मयत अमोल सखाराम बळे हा राहत असलेल्या सिध्दार्थ नगर अहमदनगर येथे येवून आरोपी नं. २ याने त्यास फोन करून तु फार चांगले काम केले व माझी बहिण हिस तु आमच्या स्वाधीन केले त्यासाठी आम्हाला तुला भेटायाचे आहे. तु बाहेर ये असे म्हणून मयत अमोल यास रूमच्या बाहेर बोलावून घेतले. तेंव्हा अमोल रूमच्या बाहेर स्वाथ्य हॉस्पीटल येथे बाहेर आला असता, त्यास आरोपींनी स्कार्पीओ गाडीत बसण्यास सांगितले. परंतु गाडीमध्ये आरोपी नं. १,३,४,५ व इतर चार अनोळखी इसम बसलेले असल्याने मयत अमोलने गाडीत बसण्यास नकार दिला. तेव्हा आरोपी क. १ रूपचंद बळे याने मयत अमोल यास बंदुकीसारखी गन अमोलच्या पोटाला लावली व बळजबरीने गाडीत बसवून मयत अमोल यास दौण्ड रोड वरील, बाळे मासेवाला ढाबा चे पाठीमागील बाजूस आरोपी नं. १ च्या घरात नेवून मयत अमोल यास म्हणाला की, आमची मुलगी हिस तु फुस लावून, आमीष दाखवून अहमदनगरला बोलावून घेतले तुझा काय विचार आहे. तेंव्हा मयत अमोल आरोपींना म्हणाला की, मी तिला नाही बोलावले तिच आली. तिनेच मला फोन केला व मला म्हणाली की, तुला भेटायचे आहे. असे त्यास समाजावून सांगत असताना वरील आरोपींनी व इतर चार अनोळखी इसमांनी मयत अमोल यास, लोखंडी रॉड, लाकडी काठ्या, चप्पल-बुटांनी बेदम मारहाण केली व पुन्हा बळे मासेवाला ढाबा दौण्ड रोड या ठिकाणाहून सांयकाळी ७ वाजणेच्या सुमारास स्कार्पीओ गाडीमध्ये मयत अमोल यास टाकून अहमदनगर दिल्ली गेट येथे आणून टाकले. त्यानंतर एका अॅटो चालकाने अमोल यास रूमवर आणून सोडले त्यानंतर अमोल यास जास्त मार लागल्याने त्याच्या मित्राने अमोल यास उपचाराकामी हार्ट बीट हॉस्पीटल, अहमदनगर येथे दाखल केले. तेंव्हा अमोल याने त्याच्या फोनवरून औरंगाबाद येथील त्याचा भाऊ भाऊसाहेब तुकाराम बळे यास वरील घटनेबाबतची सर्व माहिती सांगितली. मयताचा भाऊ व त्याचे आईवडील त्वरीत अहमदनगर येथे अमोल यास भेटण्यास हार्ट बीट हॉस्पीटल येथे आले तेंव्हा मयत अमोल याने पुन्हा त्याचा भाऊ भाऊसाहेब यास घटनेबाबतची माहिती दिली. अमोल याने असेही सांगितले की, मारहाण करताना आरोपी दत्तात्रय बळे याने अमोल याचा मोबाईल काढून घेवून त्यातील सिमकार्ड परत केले.
हार्ट बीट हॉस्पीटलमध्ये अमोल याची प्रकृती गंभीर झाल्याने त्यास त्यानंतर दि. २८.०५.२०१८ रोजी त्यास औरंगाबाद येथील जे. जे. प्लस हॉस्पीटल मध्ये अॅडमिट केले. आरोपीने केलेल्या मारहाणीमध्ये अमोलच्या पोटावर, छातीवर, हातापायाला, फुफुसाला, किडनीला जबर मार लागलेला होता. त्यानंतर अमोलवर जे. जे. प्लस हॉस्पिटलमध्ये उपचार चालू असताना दि.०६.०६. २०१८ रोजी रात्री ८.४० वाजणेच्या सुमारास मयत झाला. त्यानंतर फिर्यादी याचा कांती चौकी, पोलिस स्टेशन औरंगाबाद येथे आरोपी विरुध्द तक्रार केली. फिर्यादीच्या जबाबावरून कांती चौक पोलिस स्टेशन यांनी गुन्हा तोफखाना पोलिस स्टेशन यांच्या हृददीत घडला असल्याने त्याची तकार अहमदनगर येथे पाठविली. सदर फिर्यादीचा तपास करून तपासी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक विशाल एल. सनस यांनी मा. न्यायालयात सर्व पुराव्यासह दोषारोपपत्र दाखल केले.

सदर खटल्यामध्ये सरकार पक्षातर्फे पक्षातर्फे एकूण १६ साक्षीदारांची साक्ष नोंदविली. सदर खटल्यामध्ये तपासी अधिकारी यांनी घटनास्थळावरून सी.सी.टी.व्ही. फुटेज व डी.व्ही. आर जप्त केलेला होता. सदर खटल्यामध्ये फिर्यादी, वैद्यकिय अधिकारी, पंच साक्षीदार, व तपासी अधिकारी यांच्या महत्वपूर्ण साक्षी घेण्यात आल्या होत्या. मा. न्यायालयाने आलेल्या साक्षीपुराव्याच्या आधारे आरोपींना वरील प्रमाणे शिक्षा ठोठावली. तसेच आरोपी क्रमांक ५ व ६ यांना सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्त केले. सरकार पक्षातर्फे अति. सरकारी अभियोक्ता अॅड. अनिल डी. ढगे यांनी काम पाहिले, त्यांना जिल्हा सरकारी वकील सतीश पाटील यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. पैरवी अधिकारी पोलिस हवालदार कृष्णा एन. पारखे यांनी सहकार्य केले