Wednesday, April 17, 2024

पारनेर मध्ये कडकडीत बंद..पोलीस ठाण्यावर मोर्चा.. युवराज पठारे हल्ला प्रकरणी तिघे अटकेत

पारनेर(प्रतिनिधी):कॉर्नर शहरात काल गुरुवारी भरदिवसा गर्दीच्यावेळी रस्त्यावर शिवसेना नगरसेवक युवराज पठारे यांच्यावर गावठी कट्ट्याने गोळीबार करण्याचा प्रयत्न झाला. मात्र यातून ते बालबाल बचावले. घटनास्थळी असलेल्या नागरिकांनी अल्पवयीन असलेल्या आरोपीला पोलिसांच्या स्वाधीन केलं. गावठी कट्ट्यातील गोळी न चालल्याने आरोपीने चाकूने नगरसेवक पठारे यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्नही केला होता. एकूणच शांतता प्रिय असलेल्या पारनेर मधील या घटनेने एकच खळबळ उडाली.

नागरिकांमध्ये यामध्ये तीव्र संताप निर्माण झाला असून पारनेरची शांतता बिघडवणाऱ्या समाजविघातक विघ्नसंतोषी व सामाजिक शांतता बिघडवणार्या गुंडांवर कडक कारवाई व्हावी अशी नागरिकांतून मागणी पुढे आली. या पार्श्वभूमीवर आज पारनेर शहरांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. त्याचबरोबर नागरिकांनी एकत्र जमून उस्फूर्तपणे पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला.
जुन्या वादातून नगरसेवक पठारे यांच्यावर हा जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. पठारे यांच्या फिर्यादीवरून गणेश चंद्रकांत कावरे, संग्राम चंद्रकांत कावरे (दोघेही रा.वरखेड मळा, ता.पारनेर), एक अल्पवयीन, महेश राजू खेडेकर (रा.पारनेर), ओमकार गणेश मुळे (रा.देवीभोयरे, ता.पारनेर) यांच्या विरोधात खुनाच्या प्रयत्नासह विविध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेची अधिक माहिती घेण्यासाठी प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी देवेन भारती व पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांनी दिग्विजय समोरील घटनास्थळी भेट दिली. गुरूवारी (दि १५) सकाळी एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याने नगरसेवक पठारे यांच्यावर गावठी कट्ट्यातून गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. स्ट्रीगर दाबल्यानंतर गोळी कट्टयातच आडकल्याने मोठा अनर्थ टळला. गोळीबार फसल्यानंतर त्या आरोपीने खिशातील चॉपर काढून पठारे यांच्यावर वार करण्याचा प्रयत्न केला.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles