पारनेर तालुका लाडकी शेतकरी बहीण योजना; प्रशांत गायकवाड यांची घोषणा…
अहमदनगर जिल्हा बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड यांच्या संकल्पनेतून त्यांचे वडील कृषिभूषण सबाजीराव गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्ताने पारनेर तालुक्यातील सर्व सामान्य कुटुंबातील शेतकरी महिला भगिनींसाठी लाडकी शेतकरी बहीण योजना राबविण्यात येणार आहे या योजनेच्या माध्यमातून तालुक्यातील पहिल्या पन्नास महिलांसाठी कृषिभूषण सबाजीराव गायकवाड प्रतिष्ठान प्रयत्नातून विकास सेवा सोसायटी व इतर खाजगी बँकेच्या माध्यमातून जे नवीन ट्रॅक्टर जे घेणार आहेत अशा प्रथम ५० शेतकरी महिलांसाठीच ही योजना राबविण्यात येणार आहे. त्याचा कर्जाचा नियमित हप्ता जी कर्जदार महिला भरणार आहे. त्यांच्या कर्जाचा शेवटचा हप्ता प्रतिष्ठान मार्फत भरण्यात येणार असल्याचे जिल्हा बँकेचे संचालक प्रशांत छायाबाई सबाजीराव गायकवाड यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना पारनेर या ठिकाणी सांगितले…