Tuesday, September 17, 2024

सुजित झावरे पाटील यांच्या प्रयत्नातून पारनेर तालुक्यात विविध विकासकांचे भुमिपुजन

चिंचोली येथे सुजित झावरे पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर करण्यात आलेल्या भगतवाडा रस्ता काँक्रिटीकरण करणे सदर रस्त्याचे भूमिपूजन समारंभ सुजित झावरे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. सदर रस्त्यासाठी ५०.०० लक्ष रू. निधी मंजूर करण्यात आलेले आहे. काही महिन्यांपूर्वी चिंचोली भगतवाडा व परिसरातील ग्रामस्थांनी सुजित झावरे पाटील यांच्याकडे सदर रस्त्यासाठी निधी उपलब्ध करणेबाबत मागणी केली होती. यासाठी सुजित झावरे पाटील यांनी शासन दरबारी वेळोवेळी पाठपुरावा करून ५०.०० लक्ष रू निधी मंजूर करून आज प्रत्यक्षात भूमिपूजन करून काम सुरु होणार असल्याने ग्रामस्थांनी सुजित झावरे पाटील यांचा सत्कार करून आभार व्यक्त करण्यात आले.
यावेळी लोणी मावळा गावचे सरपंच विलास शेंडकर, पुणेवाडी गावचे मा.सरपंच बाळासाहेब रेपाळे, शहाजी कवडे, अमोल रासकर, सतिश पिंपरकर, जयदीप पिंपरकर, मच्छिंद्र पिंपरकर, बन्सीभाऊ सातपुते, तुकाराम झंझाड, महेश झंझाड, मोहन काका पोळ, लहू सातपुते, भगत गुरूजी, अण्णासाहेब भगत, प्रदिप पिंपरकर, दत्ता झंझाड, नानाभाऊ सातपुते, विजू काका सोनवणे, प्रदीप झंझाड, गणेश पिंपरकर, नानूबाई भगत, राहूल पिंपरकर, तेजस सातपुते, माधव पिंपरकर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles