अहमदनगर : पारनेर निघोज-वडगाव रस्त्यावर हॉटेल जत्राच्या मालकावर एका टोळक्याकडून तलवारीनं हल्ला करण्यात आला आहे. ही धक्कादायक घटना हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. दरम्यान, या हल्ल्यात गणेश भुकन, प्रवीण भुकन यांच्यासह हॉटेलमधील कर्मचारीही गंभीर जखमी झाले आहेत.
पारनेर तालुक्यातील निघोज -वडगाव रस्त्यावर हॉटेल जत्राच्या मालकावर चार ते पाच जणांच्या टोळक्यानं तलवारीनं जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात हॉटेल मालकासह इतरही कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. ही धक्कादायक घटना हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. या घटनेत गणेश भुकन , प्रविण भुकन यांच्यासह हॉटेलमधील कर्मचारी गंभीत जखमी झाले आहेत. जखमींना नगरच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत. काहींची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.
मंगळवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेत परिसरात खळबळ पसरली आहे. या प्रकरणी पारनेर पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे. हा हल्ला नेमका कुणी आणि कशासाठी केला? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समजू शकलेली नाही. हॉटेलच्या बिलावरून वाद झाल्यानं हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मात्र पारनेर तालुक्यातील अशा घटना वाढत असून पोलीस प्रशासनाबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे.