Thursday, September 19, 2024

पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघाची जागा शिवसेनेलाच राहणार – शशिकांत गाडे !

पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघाची जागा हक्काने महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेलाच राहणार आहे. त्यामुळे शिवसैनिकांनी कामाला लागावे, असा संदेश शिवसेनेचे जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे यांनी दिला.

शिवसेनेच्या भगवा सप्ताहनिमित्त आयोजित भव्य मशाल यात्रेच्या शुभारंभप्रसंगी टाकळी ढोकेश्वर येथील कार्यक्रमात गाडे बोलत होते. ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान पारनेर तालुक्यातील शिवसैनिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता.परंतु आपण जुन्या नव्या सैनिकांनी महाविकास आघाडीचा धर्म पाळत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला. हे मोठं काम आपण सर्वांनी केलं. ही हिम्मत आपण दाखवली, याचं कौतुक केलं पाहिजे.परंतु आपण जुन्या नव्या सैनिकांनी महाविकास आघाडीचा धर्म पाळत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला. हे मोठं काम आपण सर्वांनी केलं. ही हिम्मत आपण दाखवली, याचं कौतुक केलं पाहिजे.

त्यामुळेच लोकसभेच्या निकालामध्ये खासदार निलेश लंके यांच्या विजयात पारनेर तालुक्यातील शिवसैनिकांचा सिंहाचा वाटा असल्याचे मत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांनी व्यक्त केले.यावेळी उपजिल्हाप्रमुख संदेश कार्ले, तालुकाप्रमुख डॉ. श्रीकांत पठारे, युवा सेना तालुका प्रमुख अनिल शेटे, महिला आघाडी प्रमुख प्रियंका खिलारी, शेतकरी आघाडी तालुकाप्रमुख गुलाबराव नवले, जेष्ठ नेते डॉ. मास्कर शिरोळे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक किसन सुपेकर, बाबाजी तनपुरे, संतोष साबळे, संतोष येवले, सखाराम उजागरे, बाबा रेपाळे, सरपंच रामदास खोसे, सुनिता मुळे, देवराम मगर,

धनंजय निमसे, दिपक मावळे, नितीन आहेर, अनिकेत देशमाने, अक्षय गोरडे, शुभम गोरडे, सुयोग टेकुडे तानाजी मुळे, मोहन पवार, मुकेश गवळी, विळी, डॉ. नीता पठारे, मंगल पठारे, राजू बोरूडे, अक्षय दुश्मन, अशोक बोरुडे, स्वप्नील पुजारी, प्रशांत निंबाळकर, विशाल पठारे, गोरख पठारे, मंगेश सालके, गंगाधर पठारे, श्याम पठारे, दत्ता टोनगे, महेंद्र पांढरकर, ऋषिकेश नरसाळे, दिपक सुपेकर, अशोक सालके, कानिफनाथ पठारे, रामेश्वर ठाणगे, अशोक भोसले, नितीन पठारे, पप्पू रोकडे, मोहित जाधव, ऋषिकेश माने, प्रदीप चौधरी, राहुल मोरे, अशोक चौधरी, अभिजीत पवार आदी उपस्थिती होते.

जिल्हाप्रमुख गाडे यांनी पारनेरचे शिवसेना तालुकाप्रमुख डॉ. श्रीकांत पठारे यांच्यावर स्तुतीसुमने उधळली. डॉ. श्रीकांत पठारे हे पारनेर तालुक्याचे भूषण असून लोकसभा निवडणुकीत डॉ. श्रीकांत पठारे यांच्या कामाची व संघटन कौशल्याची चुणूक पक्षश्रेष्ठींच्या लक्षात आलेली असून पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघाची जागा हक्काने महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेला ठेवणार असल्याचे सुचक विधान जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांनी केले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles