शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी कटिबद्ध सुजित झावरे पाटील वासुंदे येथे वैयक्तिक लाभाचे साहित्य वाटप
पारनेर/प्रतिनिधी : राज्य शासन व केंद्र शासन यांच्या माध्यमातून सर्वसामान्य व्यक्तीला केंद्रबिंदू मानून अनेक वैयक्तिक लाभाच्या योजना सुरू आहेत या योजना सर्वसामान्य शेतकरी ग्रामस्थ व महिला युवक युवती यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करून कटिबद्ध असल्याचे मत जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांनी व्यक्त केले. वासुंदे येथे वैयक्तिक लाभाचे साहित्य वाटप करण्यात आले यावेळी झावरे बोलत होते ते पुढे म्हणाले पारनेर तालुक्यातील अनेक गावांमध्ये वैयक्तिक लाभाच्या योजना पोहोचविल्या आहेत ग्रामीण भागामध्ये शासकीय योजनांची माहिती वेळेवर पोहोचत नाही त्यामुळे शासकीय योजनांची माहिती सांगून ती योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठीच आम्ही काम करत आहोत.
वासुंदे येथील बांधकाम कामगार मजुर यांना महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार कल्याणकारी योजना यांच्या मार्फत गावातील २३१ कुटुंबीयांना कामगार, मजुर यांना घरगुती भांडी (१०,०००/- रू किंमतीचे) साहित्य वाटप सुजित झावरे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी सरपंच विमलताई झावरे, उपसरपंच शंकर बर्वे, चेअरमन नारायण झावरे, रणजीत काका पाटील, व्हा चेअरमन रामचंद झावरे, भाऊसाहेब सैद, दिलीप पाटोळे, स्वप्निल झावरे, पोपटराव झावरे, लहानभाऊ झावरे, लक्ष्मण झावरे, बाळासाहेब झावरे, रामदास झावरे, मारूती औटी, बाळासाहेब पानसरे, बाळशिराम सैद, बाळासाहेब वाबळे, अर्चना दाते, सोनाली झावरे, शालन साळुंके, मनीषा रोहकले, प्रियांका बा. गांगड, अरुणा चिकणे, सायली झावरे, अवंतिका हिंगडे, सुनिता खराबी, रेखा हिंगडे, मंगल हिंगडे, नशिरा शेख मुन्नाबाई जगदाळे आदी महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.
सुजित झावरे पाटील यांच्या माध्यमातून पारनेर तालुक्यात व वासुंदे गावात अनेक शासकीय योजना राबविल्या जात आहेत. बांधकाम कामगार कल्याणकारी योजनेचा वैयक्तिक लाभ सर्वसामान्य मजूर कामगारांपर्यंत पोहोचविला जात आहे. त्या माध्यमातून गावातील अनेक लोकांना लाभ होत आहे. यापुढील काळातही सुजित झावरे यांच्या माध्यमातून सर्वसामान्य व्यक्तीला पाठपुरावा करून शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणार आहे.
विमल झावरे
(सरपंच, वासुंदे)