राजकीय वनवासातही जनतेला दिलेल्या वचनाशी प्रामाणिक, आता जबाबदारी जनतेची… सुजित झावरे यांचे भावनिक आवाहन
नगर: १४ वर्षापासून मी राजकीय वनवासात असताना देखिल सदैव तालुक्यात अनेक माध्यमातून विकासकामांना निधी आणण्याचे काम आपण करीत आलो आहे. नदिजोड प्रकल्प, शाळा खोल्या, अंगणवाडया, सभामंडप, ग्रामपंचायत कार्यालय, रस्ते, बंधारे, पाझर तलाव, जनावरांच्या छावण्या, विदयुत रोहित्र, रोजगार हमी योजना कामे, पथदिवे, कोरोना सेंटर, जनावरांचे दवाखाने, आरोग्य केंद्रे, अनेक रुग्णांची मोफत शस्त्रक्रिया, वेळोवेळी आर्थिक मदत, तिर्थक्षेत्र विकास योजना, शेत पाणंद रस्ते, ठाकर समाजासाठी ठक्कर बाप्पा योजना, आदिवासींना लाभाचे साहित्य, धनगर बांधवांना सभामंडप, रस्ते, जातीचे दाखले, शासकीय योजनेत न बसणारे कामे सुध्दा केली. दलित वस्ती योजना, पाणी योजनाद्वारे ५०हून अधिक गावांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडविला. विदयुत सब स्टेशन उभारली, स्मशान भुमी शेड, उभ्या केल्या या सर्व माध्यमातून जनतेशी सदैव बांधील राहिलो.
गेल्या दोन महिन्यात १४ कोटी रु. कामे निधीसह मंजुर केली. हातामध्ये सत्ता असताना विकासकामे करणे सोपे आहे. हातात काही नसताना मी एवढी कामे केलीत सत्ता हातात आली तर किती पटीत करता येतील. याचा विचार जनतेनीच केला पाहिजे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांनी केले आहे.