Tuesday, March 18, 2025

निलेश लंकेचा प्रचार केला म्हणून एकास बेदम मारहाण; गुन्हा दाखल

नगर – तु निलेश लंकेचा प्रचार का करतो, सुजय विखेंचा का नाही असे म्हणत चौघांनी एका तरुणाला लोखंडी गज, लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत त्याच्या हातावर ब्लेडने वार केल्याची घटना पाथर्डी तालुयातील राघू हिवरे ग्रामपंचायत कार्यालयासमोर गुरुवारी (दि.१८) दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत सचिन नारायण होंडे (वय ३१, रा. राघू हिवरे, ता. पाथर्डी) यांनी गुरुवारी (दि.१८) पाथर्डी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यामध्ये म्हंटले आहे की, गुरुवारी सकाळी ११.५८ च्या सुमारास आपण मी राघुहिवरे ग्रामपंचायत समोर उभा असताना आरोपी जबर ज्ञानदेव कुर्‍हे, गोरख शंकर लबडे व अनोळखी २ इसम असे चौघेजण तेथे आले व मला म्हणाले की तु लंके यांचा का प्रचार करतो असे म्हणत शिवीगाळ केली व पुढे म्हणाले की तु विखे यांचा प्रचार कर. ते असे म्हणाले असता मी त्यांना समजावुन सांगण्याचा प्रयत्न करत असताना त्याचा त्यांना राग आल्याने गोरख शंकर लबडे यांने मला लोखंडी गजाने पोटावर व पाठीवर मारहाण केली व जबर ज्ञानदेव कुर्‍हे यांने माझे उजव्या हाताचे करंगळीवर ब्लेडने मारले व अनोळखी २ इसमांनी मला लाथाबुयाने मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिली. मारहाणीमध्ये मी खाली पडलो असतांना जबर कुर्‍हे यांने माझे पॅन्टच्या उजव्या खिशातील ९ हजारांची रोख रक्कम काढून घेतली व जाताना म्हणाले की तु पुन्हा लंके यांचा प्रचार केलास तर तुझेवर छेडछाडीचा गुन्हा दाखल करीन अशी धमकी दिली आहे. असे या फिर्यादीत म्हंटले आहे. या फिर्यादी वरून पोलिसांनी चौघा जणांच्या विरुद्ध भा.दं.वि.कलम ३२७, ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles