Tuesday, June 25, 2024

अहमदनगर जिल्ह्यातील राजकारण बदलणार! जिल्ह्यात बारा आमदार महाविकास आघाडीचे निवडणुन ….

अहमदनगर -मी प्रताप ढाकणे ईश्वरसाक्ष शपथ घेतो आहे अशी शपथ घेताना पाहायचे असेल तर कार्यर्त्यांनी आतापासूनच आपले गाव सांभाळण्याचे काम करावे.जे तुमच्या मनात आहे ते माझ्याही मनात असून येत्या विधानसभेला कोणत्याही परिस्थितीत अँड.प्रताप ढाकणे आमदार होण्यासाठी आपण प्रयत्न करणार असून तुम्ही फक्त मला साथ द्या असे आवाहन खासदार नीलेश लंके यांनी केले

लंके यांची खासदारपदी निवड झाल्या बद्दल त्यांचा राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला. संस्कार भवन येथे झालेल्या या कार्यक्रमास राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस अँड प्रताप ढाकणे,शिवशंकर राजळे,रफिक शेख,बंडु पाटील बोरुडे,राजेंद्र दौंड,नासिर शेख,गाहिनाथ शिरसाट,नवनाथ चव्हाण, अर्जुन धायतडक, रणजित बेळगे,पांडूरंग शिरसाट,चंद्रकांत भापकर,
देवा पवार,अनिल ढाकणे,योगेश रासने,योगिता राजळे,रत्नमाला उदमले,दादाभाई चौधरी, हुमायून आतार,सुभाष केकाण,माउली केळगंद्रे,दिनकर पालवे हे उपस्थित होते. या वेळी लंके यांनी विखे यांच्यावर टीका करण्याचे टाळले. या वेळी बोलताना लंके म्हणाले क, पारनेर माझी आई तर पाथर्डी माझी मावशी आहे. मोहटा देवीवर आपली श्रद्धा असल्याने आपल्या प्रचाराची सुरवात आपण मोहटा देवीगडावरून केली तर प्रचाराची सांगता सभा सुद्धा पाथर्डीत केली. अवघ्या १४ वर्षाच्या राजकीय जीवनात आपण सरपंच ते खासदार झालो ते केवळ जनतेच्या जीवावर झालो आहोत. लोकांनी ही निवडणूक हाती घेतली होती. लोकांनी ज्या दुवा दिल्या त्या मी माझ्या शेवटच्या क्षणापर्यंत विसरणार नाही. तालुक्यात पाणीटंचाई,बेरोजगारी असे अनेक प्रश्न आहेत मात्र प्रशासनाला सोबत घेऊन आपण ते सोडवणार आहोत.

ज्यांनी मला मते दिली नाही त्यांच्यावर सूड उगवण्याची काम आपण करणार नाही.देणे वाले का भी भला,न देणे वाले का भी भला हि आपली वृत्ती आहे.मी खासदार झालो यावर माझाच विश्वास बसत नाही. विधानसभेला जिल्ह्यातून बारा आमदार निवडून आणण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. प्रताप ढाकणे यांना विधानसभेत पाठवण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करणार.

मी पहिल्यांदा ग्रामपंचायतीला उभा राहिलो तेव्हा माझ्या घरच्यांनीच मलाच वेड्यात काढले होते तर पंचायत समिती निवडणुकीत माझ्याकडे साधा मोबाईल सुद्धा नव्हता मात्र आता खासदार झालो आहे. छत्रपतींच्या राज्यात महिलांचा अपमान होतो ते चूक असून कोणीही जातिभेद करू नये तसेच महिला नेत्यांविषयी आदर बाळगण्याचे काम करावे. हा तालुका विचारी लोकांचा तालुका असून स्व. बबनराव ढाकणे यांच्या सारख्या नेत्याने या तालुक्याचे प्रतिनिधित्व केले असल्याचे शेवटी लंके म्हणाले. प्रास्ताविक शिवशंकर राजळे सूत्रसंचालन योगेश रासने तर आभार नासिर शेख यांनी मानले. सत्तेची मस्ती असणाऱ्यांची मस्ती या निवडणुकीत लंके यांनी जिरवली आहे. शरद पवार यांनी लंके यांच्या सारखा साधा उमेदवार दिला अन जनतेने पैसा व सत्तेला लाथ मारत लंके यांना निवडून दिले असल्याचे या वेळी प्रताप ढाकणे म्हणाले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles