Tuesday, April 23, 2024

भाजप नेत्या पंकजा मुंडे समर्थकांनी पाथर्डी ते मोहटादेवी भव्य रॅली, जेसीबीतून फुलांची उधळण

अहमदनगर पाथर्डी प्रतिनिधी -भगवानगड येथून मला दिल्ली नेहमीच दिसत राहील बीड लोकसभेची निवडणूक व्यक्तीची नाही तर विचारधारेची पंकजा मुंडे भगवानगडावरून मला दिल्ली कायमच दिसत राहील अशी आई रेणुकामाता मोहटादेवी चरणी प्रार्थना करते तसेच बीड लोकसभेची निवडणूक ही कुठल्या एका जाती धर्माची लोक नसून जाती आणि धर्माच्या भिंतीच्या पलीकडे बीड लोकसभेला माझ्याविरुद्ध दिलेला उमेदवार कुणीही असेल त्या व्यक्तीच्या विचारधारेशी आणि बीड जिल्ह्याच्या विकासाची निवडणूक असेल असे प्रतिपादन भाजपा नेत्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी पाथर्डी दौऱ्यावर असताना श्री क्षेत्र मोहटादेवी येथे पत्रकार परिषदेत केले

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे मुंडे समर्थकांनी पाथर्डी ते मोहटादेवी भव्य रॅली काढत जेसीबीतून फुलांची उधळण करत आणि क्रेनच्या साह्याने मोठा हार घालत भगवे स्वागत केले तसेच मुंडे समर्थक असलेले प्रदूषण आयुक्त दिलीप खेडकर डॉ मनोरमा खेडकर यांच्याकडून पंकजा मुंडे यांना बीड लोकसभेची उमेदवारी मिळाल्याबद्दल नवसपूर्ती म्हणून मोहटादेवीला दीड किलो चांदीचा मुकुट पंकजा मुंडे यांच्या हस्ते अर्पण करण्यात आला.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles