Tuesday, December 5, 2023

गणेश विसर्जन मिरवणूक…. नगरमध्ये तब्बल 3524 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई

नगर: अनंत चतुर्दशीच्या दिवशी गुरूवारी जिल्हाभरात विसर्जन मिरवणूक पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर कुठलाही अनुचित प्रकार घडून कायदा व सुव्यवस्था धोक्यात येऊ नये यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाने तब्बल 3524 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. यात 26 ते 28 सप्टेंबर असे तीन दिवस 596 जणांना जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा पोलीस प्रशासनाने दिली.

आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान राजकीय शक्ती प्रदर्शनही मोठ्या प्रमाणात होणार आहे. यादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडून कायदा व सुव्यवस्था धोक्यात येऊ नये, यासाठी पोलीस प्रशासनाकडून कठोर उपाययोजना करण्यात आल्या आहेत. कलम 107 अंतर्गत 805 जणांवर, कलम 110 अंतर्गत 135 जणांवर, 151 (3) अंतर्गत एकावर, कलम 144(2) अंतर्गत 596 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच कलम 149 अंतर्गत तब्बल 1877 जणांना प्रतिबंधात्मक नोटिसा बजावण्यात आली आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles

%d bloggers like this: