Wednesday, April 30, 2025

अहमदनगरमध्ये हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश,महिला आरोपी ताब्यात

अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथे द युनिक स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असणाऱ्या हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटवर छापा टाकून पोलिसांनी चार परप्रांतीय पिडीत मुलींची सुटका केली आहे. पोलिसांनी एका महिला आरोपीला ताब्यात घेतलंय. पोलीस उपअधीक्षक संदिप मिटके यांच्या पथकाने गुरूवारी ही कारवाई केली असून आरोपी विरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईने अवैध धंदे चालवणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की गुरुवारी २१ डिसेंबर रोजी पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांना माहिती मिळाली की शिर्डी येथील पिंपळवाडी रोडचे बाजूस द युनिक स्पा सेंटरच्या नावाखाली हाय प्रोफाइल सेक्स रॅकेट चालवून वेश्याव्यवसाय करून घेतल्या जात आहे. त्याप्रमाणे सदर ठिकाणी बनावट ग्राहक पाठवून पंचासमक्ष छापा टाकून ४ पिडीत परप्रांतीय मुलींची सुटका करण्यात आली आहे. एक महिला एजंट आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून आरोपींविरुद्ध अनैतिक व्यापारास प्रतिबंध कायद्यानुसार महिला पोलीस कर्मचारी सुनंदा भारमल यांच्या फिर्यादीवरून शिर्डी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
सदरची कारवाई अहमदनगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके , शिर्डी पोलीस निरीक्षक सोपान शिरसाठ, सहायक पोलिस निरीक्षक योगिता कोकाटे, पोलीस हेड कॉन्स्टेबल इरफान शेख, अशोक शिंदे, बाबा खेडकर , महीला पोलीस कॉन्स्टेबल सुनंदा भारमल, पोलीस नाईक श्याम जाधव, पोलीस कॉन्स्टेबल दिनेश कांबळे,सोमेश गरदास, चालक आप्पासाहेब थोरमिसे यांनी केली आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles