Saturday, October 5, 2024

Ahmednagar politics:शरद पवार गटाचा श्रीगोंदा मतदारसंघात उमेदवार फायनल?

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता राज्यात राजकीय वातावरण तापू लागले आहे. अहमदनगर जिल्ह्यातही असंच वातावरण पाहायला मिळत आहे. महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या माध्यमातून येत्या निवडणुकांच्या अनुषंगाने जय्यत तयारी सुरू आहे. श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात देखील आता राजकीय नेत्यांची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.

या विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी महायुतीमध्ये अनेकजण इच्छुक आहेत. याच दरम्यान श्रीगोंदा कुकडी सहकारी साखर कारखाना चेअरमन माजी आमदार राहुल जगताप यांनी यांनी आज माळेगावमध्ये इंजिनिअरिंग कॉलेज शरद सभागृह येथे शेकडो कार्यकर्त्यांचे शिष्टमंडळ घेऊन राष्ट्रवादी सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली.श्रीगोंदा मतदारसंघात राहुल जगताप हेच उमेदवार असतील. त्यांना कामाला लागा असे सांगत नगर जिल्ह्यातील आठ जागा राष्ट्रवादी लढणार असून त्यात श्रीगोंदा जागा ही राष्ट्रवादीचीच असल्याचे घोषित केले असल्याचा दावा शिष्टमंडळातील कार्यकर्त्यांनी केला आहे. यावेळी शरद पवार यांनी राहुल जगताप यांना कामाला लागा अस सांगत आता आणलेली साकळाई आणि कुकडी बोगद्याचा प्रश्नांच निवेदन न देता हे प्रश्न आमदार होऊनच सोडवा असे असल्याचा दावाही शिष्टमंडळातील कार्यकर्त्यांनी केला आहे.

तसेच, मध्यंतरी संजय राऊत यांनी श्रीगोंदा मध्ये शिवसेना उमेदवारी घोषित केली होती. मात्र महाविकास आघाडीतील तीन पक्ष मिळवू उमेदवार ठरवणार असल्याने शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एकट्याने उमेदवारी घोषित करणे बरोबर नाही असे ही शरद पवार यांनी सांगितले असल्याचेही कार्यकर्त्यांनी सांगितले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles