नगर शहरात प्रदीर्घ काळ राजकारण करताना कुठेही कटूता येणार नाही, याची काळजी घेतली. सर्वांना बरोबर घेत सर्व पक्षांशी चांगले संबंध जपले. राजकारणापेक्षा मैत्री जपली. मात्र काही वर्षांपूर्वी एक खूप मोठी चूक झाली. त्यामुळे आपले नगर शहर बदनाम झाले आणि मागे गेले. ती चूक सुधारायची असून, ती वेळ आली आहे,” अशी सूचक प्रतिक्रिया ज्येष्ठ नेते माजी आमदार दादाभाऊ कळमकर यांनी व्यक्त केली.
नगर शहर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार दादा कळमकर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या घरी जाऊन त्यांचे अभीष्टचिंतन केले.
शहरात व्यापार आणि औद्योगिक क्षेत्र शहरात कमी होत आहे. हे वेळीच रोखले नाही, तर शहर बकाल होईल.” मी आणि अनिल राठोड 5 वेळा विधानसभा विरोधात लढलो. पण निवडणुका संपल्यावर मतभेद विसरून कायम एकमेकांच्या सुख-दु:खात सहभागी होत होतो. नगरपालिकेच्या माध्यमातूनही शहराच्या विकासासाठी अनेकदा भाजपला बरोबर घेतले.
यावेळी भाजपचे माजी जिल्हध्यक्ष भानुदास बेरड, शहर-जिल्हाध्यक्ष ॲड. अभय आगरकर, माजी शहराध्यक्ष वसंत लोढा, सरचिटणीस सचिन पारखी सचिन पारखी, भाजपचे सरचिटणीस प्रशांत मुथा, महेश नामदे, माजी महापौर अभिषेक कळमकर, माजी नगरसेवक आसाराम कावरे, बाळासाहेब खताडे, युवा मोर्चा अध्यक्ष मयूर बोचूघोळ, मुकुल गंधे आदी उपस्थित होते.
वसंत लोढा यांनी दादा कळमकर पुलोदमधून विधानसभा लढताना सर्वांनी एकमताने त्यांना पाठिंबा दिला होता.
लता लोढांनाही शहराच्या पहिल्या महिला नगराध्यक्षा होण्यासाठी दादांनी मदत केली. मात्र शहरात ज्यांचे राजकारण संपल्यात जमा होते, अशांना दादांनी मदत करून आमदार केल्याने शहराचे खूप मोठे नुकसान झाले. त्याचे दूरगामी फळ नगरकर भोगत आहेत. त्यामुळे आगामी काळात शहराच्या भवितव्यासाठी दादांनी योग्य मार्गदर्शन करावे, असे म्हटले.