नगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील जेऊर येथील माजी ग्रामपंचायत सदस्य एकनाथ वाघ व विद्यमान सोसायटी सदस्य अर्जुन वाघ, साहेबराव वाघ तसेच तोडमलवाडी येथील सतीश तोडमल यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी माजी मंत्री प्राजक्त तूनपुरे व राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे व्ही जे एन टी चे जिल्हा अध्यक्ष दत्तू डोकडे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षांमध्ये प्रवेश केले यावेळी गोरक्ष ससे, सागर मगर, अरुण ससे आदी उपस्थित होते.
यावेळी माजी मंत्री प्राजक्ता तनपुरे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये नागरिकांचा कळ वाढत आहे. येणाऱ्या विधानसभा लक्षात घेता पक्षाच्या वतीन सर्वांना समान घेऊन कार्य केले जाणार असल्याची भावना व्यक्त केली तर व्ही जे एन टी चे जिल्हा अध्यक्ष दत्तू डोकडे म्हणाले की, गाव तेथे शाखा स्थापन करून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हा बळकट करण्यासाठी कार्य चालू असल्याची भावना व्यक्त करत लवकरच शेतकऱ्यांच्या विविध प्रश्न संदर्भात मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगितले.
आ.प्राजक्त तनपुरेंची नगर तालुक्यात फिल्डिंग…माजी ग्रा.पं.सदस्य शरद पवार गटात
- Advertisement -