नगरमधील भाजप नेते माजी मंत्री आमदार राम शिंदे यांनी चार राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘सरकारनामा’ने सदर वृत्त दिले आहे.
आ. राम शिंदे म्हणाले, “भाजपचा विजयरथ लोकसभा 2024 मध्ये, असाच दौडत राहणार आहे. लोकसभा 2024 मध्ये महाराष्ट्रात भाजप महायुती ’45 प्लस’ राहील. यात मी देखील खासदार असेल”. सध्या क्रीजवर फलंदाज आहे की नाही, याबाबत अपील झाले आहे. फिल्डिंग करणाऱ्यांनी फलंदाजाविषयी अपील केले आहे. या अपिलावर पक्ष निर्णय घेईल. क्रिजवर बॅटिंग करण्यासाठी अनेक फलंदाज इच्छुक आहेत. यादी मोठी असल्याने पक्ष निर्णय घेईल असेही ते म्हणाले.
पण क्रिझवर असलेल्या फलंदाज अपिलामुळे घायाळ झाला आहे. घाबरून गेलाय. त्याला काहीच कळत नाही. ज्याबरोबर लढला, त्यालाच घेऊन पळतोय. हाच फलंदाजच बाॅलरला सांगतोय आऊट नाही म्हणून सांग. परंतु फलंदाजाने पॅट, ग्लोज सोडलेत. हेल्मेट काढले आहे. त्यामुळे फलंदाजाला देखील माहीत आहे की, आऊट झालो आहे म्हणून!”