Monday, April 22, 2024

कांदा निर्यात बंदी जैसे थे, मग अमित शहांच्या भेटीमागे नक्की कारण काय? विखे पाटील यांच्या भूमिकेवर पक्षातूनच साशंकता…

नगर : देशाचे गृहमंत्री अमित शहा यांना एका आठवड्यात दोनदा भेटण्यासाठी कोणता गहन प्रश्न निर्माण झाला होता? कांदा निर्यातबंदी प्रश्नावर भेटल्याचे सांगताना कांदा निर्यातबंदी का उठली नाही? याचा अर्थ कांदा निर्यातबंदीवर चर्चा झाली की नाही? की अन्य काही विषय होता, अशी साशंकता माझ्या मनात निर्माण होते आहे, असा टोला माजी पालकमंत्री आमदार राम शिंदे यांनी विद्यामान पालकमंत्री राधाकृष्ण विखे व खासदार डॉ. सुजय विखे यांना लगावला आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या उपस्थितीत गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात टंचाई आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर माजी मंत्री आमदार शिंदे पत्रकारांशी बोलत होते.

कांदा निर्यातबंदी उठली नाही, त्यामुळे गृहमंत्र्यांशी तुम्ही नेमकी कोणत्या प्रश्नावर चर्चा केली, असा कोणता प्रश्न होता की ज्यामुळे आठ दिवसांत दोनदा भेट घ्यावी लागली, जशी नागरिकांच्या मनात या भेटीबद्दल शंका आहे तशीच माझ्याही मनात शंका आहे, अशी टिप्पणीही आमदार शिंदे यांनी केली.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles