Tuesday, April 30, 2024

राज्यात मला माननारा युवकांचा मोठा वर्ग आहे… लोकसभा निवडणुकीबाबत लवकरच भूमिका घेऊ… सत्यजित तांबेंचे वक्तव्य…

नगर जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून नगर दक्षिण व शिर्डी लोकसभा मतदारसंघात उमेदवारांची नावे ही जाहीर झाली आहेत.

उमेदवारांच्या प्रचारासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी देखील कंबर कसले असून ठिकठिकाणी सभा घेत जोरदार प्रचार सुरू आहे. मात्र हे सगळे सुरू असताना आमदार सत्यजित तांबे हे लोकसभा निवडणुकीपासून अद्याप दूर असल्याचे दिसते आहे.

सत्यजित तांबे म्हणाले की, अहमदनगर जिल्ह्यातील लोकसभा निवडणुक ही तिसऱ्या टप्प्यात असून याला अद्याप वेळ आहे. उत्तर महाराष्ट्र मध्ये आठ मतदारसंघ असून नगर लोकसभेला अद्याप वेळ आहे. मी माझी भूमिका योग्य वेळी मांडेल. महाराष्ट्रातील प्रत्येक मतदारसंघांमध्ये वेगवेगळी परिस्थिती आहे. महाराष्ट्रमध्ये मला मानणारा एक मोठा युवक वर्ग आहे. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी मतदार निहाय कशी भूमिका घ्यायची याबाबत मी योग्य वेळ आली की माझी भूमिका स्पष्ट करील असं यावेळी बोलताना तांबे म्हणाले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles