Friday, February 23, 2024

Ahmednagar politics : नागवडे दाम्पत्याचे राष्ट्रवादी प्रवेशावर शिक्कामोर्तब

श्रीगोंदा : नागवडे कुटुंब हाच आमचा पक्ष आहे. राजेंद्र नागवडे तुम्ही घेताय त्या निर्णयास आमची साथ राहील. मात्र काहीही झाले तरी यंदा अनुराधा नागवडे यांना आमदार करायचे, अशी भूमिका काँग्रेस कार्यकर्त्यांनी मांडली. त्यावर मी व अनुराधा नागवडे यांनी सकाळीच आज काँग्रेस जिल्हाध्यक्षपदाचे राजीनामे दिले आहेत, असे राजेंद्र नागवडे यांनी सांगितले. पुढील आठवड्यात आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करू, असे नागवडे यांनी जाहीर करताच
कार्यकर्त्यांनी समर्थन दिले.बुधवारी सायंकाळी श्रीगोंदा येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याबाबत कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी जिजाराम खामकर होते.

राजेंद्र नागवडे म्हणाले, दोनदा दुसऱ्यांना आमदार शिवाजीबापूंच्या आशीर्वादाने जनतेसाठी काम चालू आहे. तालुक्याचे प्रश्न सोडविण्यासाठी गॉडफादर हवा होता तो मिळाला आहे. उद्या उमेदवारी मिळो अथवा ना मिळो लढायचा निर्णय पक्का आहे. अजित पवार यांनी वांगदरी रस्ता व
आपणास एमआयडीसी प्रश्नावर आपणास मदत केली. बाबासाहेब भोस, सुभाष शिंदे, शिवाजीराव पाचपुते, राकेश पाचपुते,सतीश मखरे, महेश तावरे,प्रमोद शिंदे,महेश जंगले, निवास नाईक, शहाजी गायकवाड, प्रकाश बोरुडे, भीमराव नलगे, चांगदेव पाचपुते, रुपेश इथापे यांची भाषणे झाली.

पवारांचे उमेदवार नागवडेच…आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीकडून श्रीगोंद्यात अनुराधा नागवडे यांची उमेदवारी उपमुख्यमंत्री अजित पवारयांनी निश्चित केली आहे. त्यामुळे उमेदवारीचा विषय संपला आहे. आता पुढची तयारी करायची आहे. माझ्यावर काहीजण शंका घेत आहेत. मात्र माझे लोणीतील राजकारण नागवडे यांनी जिवंत ठेवले आहे. त्यामुळे नागवडे यांना आमदार करण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असे बाळासाहेब नाहाटा यांनी सांगितले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles