Saturday, December 7, 2024

नगर जिल्ह्यात आमचे सर्वाधिक आमदार, लोकसभेची जागा हवीच…अजित पवार गटाचा दावा

नगर जिल्ह्यातील लोकसभेच्या दोनपैकी एका जागेवर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने दावा केला आहे. सध्या खा. सुजय विखे अहमदनगरमधून तर खा. सदाशिव लोखंडे शिर्डीमधून विद्यमान खासदार आहेत. अजित पवार यांनी यापैकी एक जागा मिळावी, असे भाजप आणि शिवसेनेच्या नेतृत्वाकडे मागणी केल्याची माहिती आहे.

राष्ट्रवादीचे अहमदनगर शहराचे आमदार संग्राम जगताप (अजित पवार गट) या संदर्भात म्हणाले, पक्षाला अहमदनगर किंवा शिर्डीतून निवडणूक लढवायची आहे. जिल्ह्यात सर्वाधिक आमदार राष्ट्वादीचे आहेत. अजित पवार यांनी या मुद्यावर भाजप आणि शिवसेनेच्या राज्य नेतृत्वाला विनंती केली आहे. त्यामुळे आमचा पक्ष अहमदनगर जिल्ह्यात एक जागा मिळविण्यासाठी आशावादी आहे.

आ. जगताप लोकसभा निवडणुकीशी संबंधित कामांसाठी महायुतीचे समन्वयक आहेत. ते म्हणाले, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत अहमदनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने १२ पैकी ६ जागा जिंकल्या होत्या. राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतरही अजित पवार गटात चार आमदार आहेत. जे जिल्ह्यातील सर्व पक्षांच्या तुलनेत सर्वाधिक आहे. आमच्या आमदारांनी मोठ्या फरकाने निवडणूक जिंकली होती. त्यामुळे जिल्ह्यातील एका लोकसभा जागेसाठी आमचा पक्ष स्वाभाविकपणे दावेदार आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles