निलेश लंके सारख्याला दमबाजी करून काय उपयोग आहे. अजित पवारांना धाडस दाखविण्याची खूप संधी होती. त्यावेळी ते दाखवलं नाही, असा खोचक टोला काँग्रेस नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लगावला आहे.
थोरात म्हणाले की, अजित पवार सगळ्या अर्थानं तगडी असामी आहेत. निलेश लंके सारख्याला दमबाजी करून काय उपयोग आहे. त्यांना धाडस दाखविण्याची खूप संधी होती. त्यावेळी ते दाखवलं नाही. लोकांनी उचललेल्या उमेदवाराला दमबाजी करून काय उपयोग, असा टोला त्यांनी यावेळी अजित पवारांना लगावला.
नगर जिल्ह्यातील दोन्ही जागांवर महविकास आघाडी विजयी होणार आहे. भाजपवरील नाराजीचा महाविकास आघाडीला फायदा होईल. मोदींकडून भाषणात दिशाभूल करणारी वक्तव्य केली जात आहे. धर्मावर आधारित मुद्दे ते सांगताय. राज्यात सुद्धा आमचा आकडा चांगला राहील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. आमच्या अंदाजापेक्षा जास्त यश आम्हाला मिळेल. घटणाऱ्या मतदान टक्केवारीचा परिणाम भाजपवर होईल. राज्यातील राजकारणामुळे जनता नाराज आहे, असेही बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.