नगर : शहरातील पतितपावन संघटनेचे जिल्हाध्यक्ष व शहरातील जेष्ठ हिंदुत्ववादी कार्यकर्ते श्रीराम धोत्रे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. आ.संग्राम जगताप यांच्या हस्ते धोत्रे यांचे पक्षात स्वागत करण्यात आले. इथुन पुढे आपण आ.संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली शहरात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष वाढवण्याचे काम करणार असल्याचे श्रीराम धोत्रे यांनी सांगितले. या प्रवेश कार्यक्रमावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष अभिजीत खोसे, शहराध्यक्ष माणिकराव विधाते, शहर संघटक राजेश भालेराव, राष्ट्रवादी उद्योग व्यापार विभागाचे शहर ज़िल्हाध्यक्ष अनंत गारदे हे उपस्थित होते.