जामखेड (नासीर पठाण): मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर नगरहून परळीकडे जात असताना मंत्री धनंजय मुंडे यांचा जामखेड शहरात स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यांचे स्वागत होण्यापूर्वीच खा. शरद पवार व आ. रोहित पवार समर्थकांनी काळे झेंडे दाखवून घोषणाबाजी करत त्यांचा निषेध नोंदवला. यातील तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.राष्ट्रवादी कॉग्रेस शरद पवार गटाच्या सुरेश भोसले, प्रकाश सदाफुले, अन्सार पठाण या तीन कार्यकर्त्यांना पोलीसांनी ताब्यात घेतले.
नगर जिल्ह्यात मंत्री धनंजय मुंडे यांचे एकीकडे स्वागत तर दुसरीकडे निषेध.. व्हिडिओ
- Advertisement -