Monday, March 4, 2024

कर्डिलेंचा नगरसेवकांना कानमंत्र… आमच्या आमदारकीच्या निवडणुकीकडे लक्ष द्या, मग आम्ही तुम्हाला मदत करू

बोल्हेगाव छत्रपती संभाजीनगर येथे श्री दत्त मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त माजी नगरसेवक कुमारसिंह वाकळे यांच्या वतीने स्नेह मेळाव्याचे आयोजन

राजकारणात सत्तेवर जायचे असेल तर स्वतःचे कर्तव्य सिद्ध करावे लागते – माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले

नगर : शहराचा विकास कामातून बदल होताना दिसत आहे, राजकारण करीत असताना त्याच्या पलीकडे जाऊन जनतेचे कामे करा, विकास कामांमध्ये पक्षीय राजकारण बाजूला ठेवून जनतेचे प्रश्न मार्गी लावा, राजकारणात सत्तेवर जायचे असेल तर स्वतःचे कर्तव्य सिद्ध करावे लागते, त्यातून जनतेचा विश्वास संपादन होतो, माजी नगरसेवक कुमारसिंह वाकळे यांनी नगरसेवक पदाच्या माध्यमातून प्रभागांमध्ये चांगले काम उभे केले असल्यामुळेच बोल्हेगाव गावचा चेहरा मोहरा बदलला आहे, नगरसेवक पदाचा कार्यकाळ संपला आहे, आता लोकसभा आणि विधानसभा निवडणुका होईपर्यंत महापालिका निवडणुकीचा विचार करू नका, आमच्या आमदारकीच्या निवडणुकीकडे लक्ष द्या, मगच आम्ही तुम्हाला मदत करू असे साकडे नगरसेवकांना घातले, कुमारसिंह वाकळे यांनी विकास कामातून लोकांचे प्रेम आणि विश्वास आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली नगर शहराची विकासाकडे झेप घेताना दिसत आहे त्यांनी शहरातील अनेक प्रश्न मार्गी लावत शहरी विकासाला खऱ्या अर्थाने दिशा दिली असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी केले.
बोल्हेगाव छत्रपती संभाजी नगर येथे श्री दत्त मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त माजी नगरसेवक कुमारसिंह वाकळे यांच्या वतीने स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले, आमदार संग्राम जगताप, माजी नगरसेवक कुमारसिंह वाकळे, माजी विरोधी पक्षनेते संपत बारस्कर, माजी स्थायी समिती सभापती मनोज कोतकर, माजी नगरसेवक डॉ. सागर बोरुडे, राजेश कातोरे, निखिल वारे, बाळासाहेब पवार, दत्ता पाटील सप्रे, ज्ञानदेव कापडे, गंगाधर वाकळे, प्रा. माणिकराव विधाते, सुभाष बारस्कर, सतीश शिंदे, बबनराव वाकळे, नितीन शेळके आदींसह प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार संग्राम जगताप म्हणाले की जिवाभावाची माणसे जेव्हा एकत्र येतात तेव्हा जनतेसाठी चांगले काम उभे राहत असते कुमार सिंह वाकळे यांनी विकासात्मक कामे उभी केली आहे त्यामुळे बोलेगाव विकसित उपनगर म्हणून ओळखले जात आहे नगरसेवक पदाचा कार्यकाळ संपला असला तरी काम करणाऱ्याचा कार्यकाळ संपलेला नाही असे ते म्हणाले.
कुमारसिंह वाकळे म्हणाले की, सामाजिक कामाची आवड असल्यामुळे राजकारणातही चांगले काम उभे करू शकलो आहे, यासाठी माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले व आमदार संग्राम जगताप यांचे सहकार्य लाभले आहे, प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी गेल्या दहा वर्षांमध्ये चांगले काम उभे केले आहे त्याचा आनंद होत आहे, या माध्यमातून नागरिकांची नेहमीच संवाद ठेवल्यामुळे ऋणानुबंध निर्माण झाले आहे, श्री दत्त मंदिराच्या माध्यमातून बोल्हेगाव परिसरामध्ये धार्मिकतेचे वातावरण निर्माण झाले आहे असे ते म्हणाले,

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles