Monday, March 4, 2024

नगर दक्षिणेतील उमेदवाराबाबत लवकरच गोड बातमी मिळेल, आ.रोहित पवारांचे सूचक वक्तव्य

नगर : नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गट उतरणार हे जवळपास निश्चित आहे. त्यामुळे या मतदारसंघातील संभाव्य उमेदवार कोण असेल अशी चर्चा रंगली आहे. भाजपला आव्हान देण्यासाठी आ.रोहित पवार तसेच खा.सुप्रिया सुळे यांच्याही नावाची चर्चा मतदारसंघात होत आहे. परंतु आता आ.रोहित पवार यांनी मोठा खुलासा केला आहे. आ.पवार यांनी म्हटले की, कर्जत जामखेडच्या लोकांनी मला भरपूर प्रेम दिले आहे. त्यामुळे मी विधानसभा निवडणूकच लढवणार आहे. सुप्रिया सुळे या सुध्दा नगरमधून लढणार नाही. परंतु, राष्ट्रवादी सक्षम उमेदवार देणार असून येत्या काळात गोड बातमी मिळेल असे सूचक वक्तव्य त्यांनी केले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles