Tuesday, May 28, 2024

१९९९ पासून फक्त एकदाच नगर दक्षिणेत यश, शरद पवारांचा डाव यंदा यशस्वी ठरणार?

नगर दक्षिणची जागा जिंकायची, असं शरद पवारांचं स्वप्न आहे. या वेळी ते स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्याची संधी आहे. शरद पवारांनी या वेळी मैदानात नीलेश लंकेंच्या रूपाने तगडा उमेदवार उतरविला आहे. महाविकास आघाडीचे नेतेदेखील एकटवले आहेत. त्यात शरद पवार नीलेश लंकेंच्या प्रचारासाठी सभांचा धुरळा उडवून देणार आहेत.

शरद पवारांची पहिली सभा 19 एप्रिलला सायंकाळी नगर शहरातील गांधी मैदानात होईल. या वेळी महाविकास आघाडीचे प्रमुख नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे. यानंतर दुसरी सभा 25 एप्रिलला शेवगाव, 28 एप्रिलला राहुरी, 6 मे रोजी कर्जत, 8 मे रोजी श्रीगोंदा, 11 मे रोजी नगर शहरात पुन्हा सभा होईल. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना १९९९ मध्ये झाली. तेव्हापासून फक्त एकदाच तुकाराम गडाख यांच्या रूपाने पवारांना नगर दक्षिणेची जागा मिळाली. मात्र इतर निवडणुकीत राष्ट्रवादीला भाजपने पराभूत केले. आता पुन्हा एकदा नगर दक्षिणेत पवारांनी लक्ष्य घातलं आहे. उमेदवार निवडीपासून त्यांनी सर्व सूत्रे आपल्याच हातात ठेवली आहेत.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles