Tuesday, March 18, 2025

विखे पाटील पिता पुत्र आणि कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंची गुप्त भेट….प्रकाश आंबेडकर यांनी केला मोठा गौप्यस्फोट…

नगर दक्षिण लोकसभेसाठी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार दिलीप खेडकर यांच्या प्रचाराची सभा आज नगरमध्ये पार पडली. यावेळी या सभेत बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसवर टीका केली. तसेच मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार सुजय विखे पाटील यांच्याबाबत गौप्यस्फोट केला.

अहमदनगरमधील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार हे २८ मे २०२३ रोजी रात्री ११:३० वाजता तुघलक लेनमध्ये काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेऊन आले आहेत. त्यामुळे ही भेट बाळासाहेब थोरात यांच्यासाठी चांगली आहे, असे मी मानत नाही. आता बाळासाहेब थोरात यांच्यासाठी दुसरी धोक्याची घंटा म्हणजे ९ जून २०२३ रोजी दुपारी ३ च्या दरम्यान मल्लिकार्जुन खरगे हे सोलापूरवरून बेंगळूरूला गेले होते. यावेळी ८ जून २०२३ रोजी राधाकृष्ण विखे पाटील यांनी मल्लिकार्जुन खरगे यांची गुप्त भेट घेतली होती. त्यांच्यामध्ये काय चर्चा झाली, हे मी आता सांगत नाही. मात्र, भाजपाची माणसं काँग्रेसला जाऊन भेटत आहेत आणि काँग्रेसवाले गाफील राहत आहेत”, असा मोठा गौप्यस्फोट प्रकाश आंबेडकर यांनी नगरच्या सभेत बोलताना केला.

बाळासाहेब थोरात यांच्याबाबत बोलताना ते म्हणाले, “मी बाळासाहेब थोरात यांना सांगू इच्छित आहे की, ही परिस्थिती चांगली नाही. आमच्यावर टीका करण्यापेक्षा तिकडे तुमचा स्वत:चा पक्ष वाचवा, नाहीतर तुमच्या हातातील काँग्रेस पक्ष हा कधी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हातात जाईल, ते सांगता येत नाही”, असा खोचक टोला प्रकाश आंबेडकर यांनी बाळासाहेब थोरात यांना लगावला.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles