भाजपसोबत युती करण्यास राष्ट्रीय समाज पक्षाकडून स्पष्ट नकार देण्यात आला आहे. भाजपमध्ये जुन्यांनाच कोणी विचारत नाही. तर आम्हाला कोण विचारणार, अशा शब्दात राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय महासचिव कुमार सुशील यांनी भाजपवर टीका केली. तसेच लोकसभेच्या निवडणुका राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळावर लढवणार असल्याचा निर्णय देखील कुमार सुशील यांनी जाहीर केला.
राष्ट्रीय समाज पक्षाची बैठक पार पडली. यावेळी पक्षाचे नगर लोकसभा प्रमुख रवींद्र कोठारी, जिल्हा अध्यक्ष जिल्हाध्यक्ष शहाजी कोरडकर, महिला जिल्हाध्यक्ष मंदाकिनी बडेकर, शहराध्यक्ष चिमाजी खामकर,रमेश व्हरकटे, भानुदास हाके(मेजर), रमजान शेख, प्रल्हाद पाटील आदि यावेळी उपस्थित होते.
लोकसभा, विधानसभेच्या निवडणुका आता जवळ येऊ लागलेल्या आहे. त्याची पूर्वतयारी करण्यासाठी आम्ही या ठिकाणी एकत्रित बैठक घेतली. भाजपमध्ये आज जुन्यांना कुणी विचारत नाही ही परिस्थिती आहे. एखादा पक्ष मोठा झाल्यावर तो वरती जातो, त्यावेळेला तो दुसऱ्याला वरती येऊ देत नाही, अशी अवस्था झाली आहे. भाजपबरोबर अनेक मित्र पक्ष नाहीत.”,असेकुमार सुशील म्हणाले.
महाराष्ट्रमध्ये सध्या अभद्र युती आहे. कोण कोणाच्या पक्षाची हात मिळवणी करेल हे काही सांगता येत नाही. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही महाराष्ट्रामध्ये स्वबळावर 48 जागा लढवणार असल्याचेही कुमार सुशील यांनी सांगितले.