कार्यकाल जरी संपला तरी कार्य संपणार नाही -सुरेखा कदम
नगर – प्रभागाचा विकास हेच ध्येय ठेवून विकास कामांना प्राधान्य देत नागरिकांचे प्रश्न मार्गी लावण्याचा आपण सातत्याने प्रयत्न केला आहे. विविध निधीच्या माध्यमातून प्रत्येक भागात कामे करुन नागरिकांना मुलभुत सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. नागरिकांना दिलेल्या आश्वासनांची पुर्तता करत प्रभागातील रस्ते, ड्रेनेज, पाणी, स्ट्रीट लाईट हे प्रश्न सोडविले. विकास कामे करतांना प्रत्येक भागाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. शिवसेनेच्या महापौर रोहिणीताई शेंडगे यांच्या सहकार्याने या भागासाठी विशेष निधी उपलब्ध करुन दिल्याने अनेक चांगली कामे झाली आहेत. नुकताच नगरसेवक पदाचा कार्यकाळ संपला असला तरी कार्य कायम सुरु राहणार आहे, असे प्रतिपादन नगरसेविका सुरेखाताई कदम यांनी केले.
नगरसेविका सुरेखा कदम यांच्या प्रयत्नातून व महापौर रोहिणी शेंडगे यांच्या निधीतून बंगाल चौकी ते बारा तोटी कारंजा येथील रस्त्याच्या डांबरीकरण कामाचा शुभारंभ महापौर रोहिणी शेंडगे यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा.शशिकांत गाडे, शहरप्रमुख संभाजी कदम, नगरसेवक दत्ता कावरे विरोधीपक्ष नेते संजय शेंडगे, संतोष गेनप्पा, सचिन शिंदे, शाम नळकांडे, अॅड.विजय मुनोत, बाबू कावरे, गणेश चव्हाण, नंदू राऊत, राजुभाई शेख, गफुरभाई शेख, गुलाबभाई शेख, सय्यद जाकिर, बाबासाहेब जहागिरदार, विजय महाराज, रामसिंग चव्हाण, अज्जू शेख, बाळू डहाळे, बालि किंगर, स्वामी टाकळकर, बंडू जाधव, वैभव पटवा, घनश्याम घोलप, हिरा चिंतामणी, सविता कावरे आदि उपस्थित होते.
याप्रसंगी प्रा.शशिकांत गाडे म्हणाले, शिवसेनेने नेहमीच सर्वसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देत ते सोडविण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळेच नगरकर हे नेहमीच शिवसेनेच्या पाठिशी उभे राहिले आहे. सुरेखाताई कदम यांनी महापौर म्हणून व नगरसेविका म्हणूनही आपल्या कामाने वेगळा ठसा उमटविला आहे. तसेच शिवसेनेच्या महापौर रोहिणीताई शेंडगे व नगरसेवकांनी शहर विकासासाठी मोठे योगदान दिले आहे. त्यामुळे येणार्या मनपातही शिवसेनेचे सर्वात जास्त नगरसेवक असतील, असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी महापौर रोहिणीताई शेंडगे म्हणाल्या, प्रभागाच्या प्रश्नांसाठी सुरेखाताई कदम यांचा नेहमीच पाठपुरावा राहिला आहे, त्यामुळे या भागात चांगली विकास कामे झाली आहेत. आताही बंगाल चौकी चे सुशोभिकरण लवकरच होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी दत्ता कावरे, संभाजी कदम, अॅड.विजय मुनोत आदिंनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अज्जू शेख यांनी केले तर आभार बाबू कावरे यांनी मानले.