Monday, March 4, 2024

दाळ-गुळ वाटणाऱ्यांवर विश्वास ठेवू नका…आ. लंके म्हणाले आता दुसऱ्यांची जिरवायची वेळ…

मी डाळ शेंगदाणे वाटणाऱ्यातला नाही. मी काम करणारा आहे. पाच वर्षांनी फिरकणारा मी माणूस नाही. नाहीतर काही लोक तुम्ही पाहिले असतील थेट पाच वर्षांनीच डाळ-गुळ घेऊन तुमच्या गावात आले असतील. लोक मेले आहेत की जिवंत आहेत, हे बघायला पुन्हा पाच वर्ष त्यांना वेळ नाही. पण इथे काहीही अडचण आली तरी मी तुमच्या सेवेसाठी सदैव तत्पर आहे, अशा शब्दात पारनेर-नगरचे आमदार निलेश लंके यांनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांचे पुत्र खासदार सुजय विखे पाटील यांचा समाचार घेतला. त्याचवेळी पारनेरमध्ये प्रतिस्पर्ध्यांची जिरवली आता दुसऱ्यांची जिरवायची आहे, असे म्हणत येणाऱ्या काळातील आपले राजकीय विरोधक विखेच असतील, याचे इरादेही त्यांनी स्पष्ट केले.
पारनेर तालुक्यातील गारखिंडी आणि कळस गावच्या दौऱ्यावर होते. यावेळी विविध विकासकामांचा शुभारंभ त्यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी गावकऱ्यांना उद्देशून केलेल्या भाषणात फटकेबाजी करताना लंके यांनी विखेंना लक्ष्य केले.

मी आमदार झालो त्याआधी सहा महिने ‘ते’ खासदार झाले, त्यांनी गावात किती कामे केली? एक रुपयाचे काम दिले नाही. मी डाळ शेंगदाणे वाटणाऱ्यातला नाही. मी काम करणारा आहे. पाच वर्षांनी फिरकणारा मी माणूस नाही. नाहीतर काही लोक तुम्ही पाहिले असतील, थेट पाच वर्षांनीच दाळ गुळ घेऊन तुमच्या गावात आले असतील. लोक मेले आहेत की जिवंत आहेत, हे बघायला पुन्हा पाच वर्ष त्यांना वेळ नाही. दाळ-गुळ वाटणाऱ्यांवर विश्वास ठेवू नका. मोठ्या लोकांच्या जास्त नादाला लागू नका. मी तुमच्या हक्काचा माणूस आहे. चुकलो तरी माझा कान धरून मी चुकलोय, असे तुम्हाला सांगता येईल. फक्त स्टेजवर भाषणे करणाऱ्या कर्तव्यशून्य लोकांवर जास्त विश्वास ठेवू नका, अशी टीका लंके यांनी विखेंवर केली.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles