रोहित पवार कर्माची फळे भोगत आहेत…खा.‌विखेंचा हल्लाबोल

0
29

रोहित पवार कर्माची फळे भोगत आहेत
शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी भाजप आमची घरं फोडतो आहे, अशी टीका केली. त्यासंदर्भात नगर मध्ये पत्रकारांशी बोलताना खासदार डॉ सुजय विखे यांनी रोहित पवार यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. खासदार विखे म्हणाले ‘सौ चूहे खाकर बिल्ली हज को चली…’ ही म्हण त्यांच्यासाठी लागू पडते. यांनी सगळ्यांचीच घरं फोडली. माझ्या सख्ख्या काकांना देखील कोणाच्या स्टेजवर कोण घेऊन गेले, अशी किती घरे त्यांनी फोडली आहेत. आज त्यांचं घर फुटलं. हे कर्म आहे. जो जसे करेल तसे त्याला भोगावे लागेल आणि ते भोगत आहेत, असा टोला खासदार विखे यांनी लगावला.