गणेश सहकारी साखर कारखाना परिसरातील कोल्हे समर्थकांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची भेट घेऊन त्यांना शिर्डी येथील नियोजित शेतकरी मेळाव्याचे निमंत्रण दिले. हे निमंत्रण पवार यांनी स्वीकारले.विवेक कोल्हे यांनी नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघात नशिब अजमावण्याचा प्रयत्न केला. भाजप नेते कोल्हे यांच्या पाठीशी होते, मात्र विखे गट वगळून. कोल्हे यांच्या पराभावाने कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचा पुन्हा प्रश्न निर्माण झाला. महायुतीत विद्यमान आमदार अजितदादा गटाचे. त्यातूनच विवेक कोल्हे विधानसभा निवडणुकीसाठी कोणती भूमिका घेणार असाही प्रश्न जिल्ह्यात उत्सुकताने विचारला जात आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर गणेश कारखान्यातील कोल्हे समर्थकांनी शरद पवार यांच्या घेतलेल्या भेटीकडे लक्ष वेधले जात आहे. गेल्या वेळच्या विजयाच्या आधारावर शरद पवार गट कोपरगावच्या जागेवर दावा सांगणार असले तरी या पक्षाकडे सध्यातरी सक्षम उमेदवार नाही. म्हणूनच युवानेते विवेक कोल्हे कोणती भूमिका घेतात, याकडे लक्ष राहणार आहे.
शरद पवारांना कोल्हे समर्थकांचे शेतकरी मेळाव्यासाठी निमंत्रण…विवेक कोल्हेंच्या भूमिकेकडे लक्ष
- Advertisement -