नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्याकडून दिवाळीच्या तोंडावर साखर वाटपचे गोड कार्यक्रम सुरू असतानाच भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे यांनी टीका केली आहे.
विवेक कोल्हे यांनी विखे यांना राज्यात तिसऱ्या क्रमांकावर मंत्रीपदाची शपथ घेतल्याची आठवण करून देत नगर जिल्ह्यातील दुष्काळीकडे लक्ष देण्याची मागणी केली आहे.
श्री गणेश सहकार साखर कारखाना विखेंकडे होता. त्यावेळी सभासदांना साखर मिळत नव्हती. कारखाना आमच्याकडे आल्यानंतर आम्ही नऊ हजार सभासदांना प्रत्येकी दहा किलो साखर देण्याची घोषणा केली. यानंतर सर्वच राहाता तालुक्यातील जनतेची दिवाळी गोड झाली.
विखेंनी मतदारसंघातील प्रत्येक कुटुंबांना पाच किलो साखर आमच्यामुळेच वाटली. लोकशाहीसाठी सक्षम विरोधकांची गरज असते. आम्ही विरोधकांना आवाज देण्याचे काम केले. राहाता तालुक्यात जनतेला अरे, तुरे करणारे आता भाऊ, दादा करायला लागलेत, यातच आमचे समाधान आहे.” असे विवेक कोल्हे यांनी म्हटले आहे.