Sunday, July 14, 2024

नगर जिल्ह्यात साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक… जिल्हा बँकेवरही गंभीर आरोप…

उसाच्या वजनात होणारी काटा मारी, नोंद असूनही वेळेत न तुटणारा ऊस, ऊसाचे मुदतीत न मिळणारे पेमेंट यासह शेतकर्‍यांची फसवणूक कारणार्‍या कारखानदारांच्या विरोधात येत्या पावसाळी अधिवशेनावर शेतकरी मोर्चा काढणार आहे, यात ट्रॅक्टर ट्रॉली, टेम्पो घेऊन हजारों शेतकरी या मोर्चात सामिल होणार असल्याची माहिती प्रहार जनशक्ती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अभिजीत पोटे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने सावेडी येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी जिल्हाध्यक्ष पोटे यांनी भूमिका मांडली. यावेळी बाळासाहेब खरजुले, जालिंदर आरगडे, सोमनाथ गर्जे, रणजित सिनारे, देविदास मलान यांच्यासह प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

यावेळी बोलतांना पोटे म्हणाले, प्रहार जनशक्ती पक्षाने जिल्ह्यातील सर्व शेतकर्‍यांसाठी लढणार्‍या संघटनाना एकत्र करून ऊस उत्पादक शेतकर्‍यांसाठी काम करत आहे. ऊस उत्पादक शेतकर्‍यांची साखार कारखाने अडवणूक करतात. जाहीर करतांना एक भाव देतात, मात्र प्रत्येक्षात वेगळा भाव शेतकर्‍यांना मिळतो. त्यातच शेतकर्‍यांना वेळेत आपले ऊसाचे बिल देखील मिळत नाही. त्यामुळे शेतकरी हा कर्ज बाजारी होत असल्याचे त्यांनी सांगितले. साखर कारखान्या विरोधात प्रहार जनशक्ती पक्ष गेल्या अनेक वर्षापासून काम करत आहे.

११ जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी, सहकार मंत्री अमित शहा यांना निवेदन दिले आहे. ऊस बिल थकवणार्‍या साखर कारखान्यांना पुढील ऊस गळीत हंगामाचे परवाने देऊ नये, तसेच त्यांच्यावर आरसी अंतर्गत जप्तीच्या कारवाई करण्याची मागणी केली होती. त्याअंतर्गत कुकडी सहकारी साखर कारखाना, अगस्ती सहकारी साखर कारखाना, वृध्देश्वर सहकारी साखर कारखाना, गंगामाई खाजगी साखर कारखाना यांच्यावर आरआरसी जप्तीची कारवाई करण्यासाठी प्रहार जन्शक्ती पक्षाचा संदर्भात घेऊन प्रस्ताव पाठवला असल्याचे पोटे यांनी सांगितले.

जप्तीच्या कारवाईवर आम्ही समाधानी नाही. अनेक वेळा जप्तीचे आदेश निघूनही परिस्थिती जशीच्या तशी आहे. या हंगामात पाच, सहा महिने होऊन देखील ऊस उत्पादक शेतकर्‍यांना थकीत बिले मिळाली नाही. त्यामुळे येत्या पावसाळी अधिवेशनात आमदार बच्चू कडू यांच्या माध्यमातून तारंकित प्र्रश्न उपस्थित केला जाणार आहे. तसेच नगर जिल्ह्यातील हजारो ऊस उत्पादक शेतकर्‍यांना घेऊन मंत्रालय व पावसाळी अधिवेशनावर सुमारे २०० पेक्षा जास्त ट्रॅक्टर ट्रॉली, ट्रक, टेम्पो घेऊन शेतकरी जाणार असल्याचे पोटे यांनी सांगितले.

शेतकर्‍यांची असणारी जिल्हा बँक कर्ज बुडवणार्‍याच्या साखर कारखान्याना कर्ज देण्याचे चुकीचे धोरण राबवत असते. साखर कारखान्यांची टोळी, हीच टोळी जिल्हा बँक चालवित असल्याचा गंभीर आरोप प्रहार जनशक्ती पक्षांचे अभिजीत पोटे यांनी केला.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles