नगर : अहमदनगर मधील नेवासकर पेट्रोल पंपावर कार्यरत असलेल्या सौ. पौर्णिमा तिवारी तसेच संजय तिवारी यांचे सुपुत्र प्रथमेश तिवारी यांनी नुकत्याच पार पडलेल्या तलाठी पदाच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. त्यांच्या या यशामुळे आनंदाचे वातावरण पसरले असून, तिवारी कुटुंबाचा हा अभिमानाचा क्षण ठरला आहे. प्रथमेश येवला (नाशिक) येथे तलाठी पदावर नियुक्ती झाले आहेत,
तिवारी कुटुंबातील सरकारी अधिकारी म्हणून नावारूपाला आलेल्या प्रथमेश तिवारी यांनी आपल्या कष्ट, परिश्रम आणि ध्येय निश्चयाच्या जोरावर हे यश संपादन केले आहे. या यशाच्या निमित्ताने त्यांचा सत्कार प्रसिद्ध उद्योजक श्री. गौतमजी मुनोत आणि मेघनाताई मुनोत यांच्या हस्ते करण्यात आला. हा सत्कार सोहळा अत्यंत साधेपणाने, पण अत्यंत भावपूर्ण वातावरणात पार पडला.
सत्कार करताना गौतम मुनोत यांनी प्रथमेश तिवारी यांच्या कर्तृत्वाचे कौतुक केले आणि त्यांना उज्ज्वल भविष्याच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी असेही म्हटले की, “प्रथमेश यांचे यश नेवासकर पंप परिवाराला प्रेरणादायी ठरणार आहे. त्यांनी कष्ट आणि निष्ठेच्या जोरावर हा मोठा टप्पा गाठला आहे.”
या सत्कार सोहळ्याला नेवासकर पेट्रोल पंपावरील कर्मचारी उपस्थित होते. यामध्ये चंद्रकांत धोका, अमित गांधी, रसिकलाल बोरा, रुचिरा मकासरे, प्रशांत जठार, निरंजन वाघ, मल्हारी ससाणे, योगेश रासकर, विष्णु जंबे, विशाल लंगोटे, अमोल बोरुडे, मधुकर केदारी आणि सुनील शिंग्रे यांची विशेष उपस्थिती होती. या सर्वांनी प्रथमेश तिवारी यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
नगरमध्ये पेट्रोलपंपावर काम करणाऱ्या आईच्या कष्टाचे चीज…मुलगा झाला तलाठी….
- Advertisement -