Tuesday, May 13, 2025

अहमदनगर शिक्षक बँकेत नूतन पदाधिकारी निवडीबाबत गुप्तता, पण चर्चा ‘या’ व्हायरल फोटोची

मंगळवारी नूतन चेअरमन, व्हाईस चेअरमन निवडीदरम्यान संचालक मंडळात मतदान प्रक्रिया घेण्याची वेळ आली. यावेळी गुरूमाऊली मंडळाने दिलेल्या चेअरमन, व्हाईस चेअरमन पदाच्या उमेदवारांचा श्रीरामपूरचे संचालक बाळासाहेब सरोदे आणि शेवगावचे संचालक रमेश गोरे यांनी पराभव केला. मतदानानंतर चेअरमनपदी सरोदे आणि व्हाईस चेअरमनपदी गोरे यांची निवड घोषित करण्यात आली.

शिक्षक बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडीनंतर ज्येष्ठ शिक्षक नेते रावसाहेब रोहकले गटाचे प्रविण ठुबे, अविनाश निंभोरे यांच्यासह अन्य नेत्यांनी नूतन चेअरमन सरोदे आणि व्हाईसचेअरमन गोरे यांचा सन्मान केला. दरम्यान, आमच्या संचालक मंडळाला बाह्यशक्तीने मदत केली, असा आरोप तांबे यांनी केला होता. त्या आरोपाला ठुबे आणि निंभोरे यांच्या सत्कारामुळे पुस्टी मिळाली असल्याचे तांबे गटाच्या उपस्थित नेत्यांनी सांगितले.

नूतन पदाधिकारी निवडीबाबत गुप्तता
शिक्षक बँकेच्या नूतन पदाधिकारी यांच्या निवडीबाबत जिल्ह्यातील सामान्य शिक्षक सभासदांना याबाबत कोणतीही कल्पना देण्यात आली नव्हती. यासह गुरूमाऊली मंडळाच्या अनेक श्रेष्ठांना देखील या निवडीसह संचालक मंडळाच्या बैठकीची माहिती सोडा साधा निरोप देण्यात आला नसल्याचे अनेकांनी निवडीवर प्रतिक्रिया देतांना स्पष्ट केले. गुरूमाऊली मंडळात आता बाहेरच्या मंडळातून आलेल्यांचे महत्व वाढले आहे. ते सांगितील याप्रमाणे आता मंडळाचे निर्णय होत असल्याचे खंत अनेक गुरूमाऊलीच्या पदाधिकार्‍यांनी या नाट्यपूर्ण घडामोडीनंतर व्यक्त केली.

थोरातांसोबतच्या बैठकीचा फोटा व्हायरल
शिक्षक बँकेच्या पदाधिकारी निवडीनंतर नगर जिल्ह्यातील गुरुजींच्या राजकारणातील अनेक व्हॉट्सअ‍ॅप गु्रपवर नूतन चेअरमन सरोदे यांच्यासह शिक्षक नेते संभाजी थोरात यांच्यात बैठक झाल्याचा फोटा व्हायरल झाला होता. या बैठकीत सरोद बैठकीच्या मध्यभागी असून यावेळी थोरात, आबासाहेब जगताप, प्रवीण ठुबे, अविनाश निंभोरे यांच्यासह थोरात गटाच्या शिक्षक नेत्यांसह गुरूमाऊलीचे काही माजी नेते दिसत आहेत. या बैठकीत थोरात यांनी तांबे गटाच्या संचालकांना आपल्या बाजूला ओढून घेतल्याचा आरोप तांबे गटाकडून होत आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles