Wednesday, February 28, 2024

प्राथमिक शिक्षकांची प्रलंबित देयके मिळणार, नगरसाठी ५८ कोटींचा निधी…

नगर : प्राथमिक शिक्षकांची सर्व प्रलंबित देयके आता शालार्थ वेतन प्रणालीमधून अदा करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. त्यासाठी शिक्षण उपसंचालकांनी नगर जिल्ह्यास ५८ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. यामुळे प्राथमिक शिक्षकांची सर्व प्रकारची प्रलंबित देयके अदा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

जिल्हा परिषदेचे प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी या संदर्भातील माहिती दिली. गेल्या तीन वर्षांपासून अनुदानाअभावी शिक्षकांची वैद्याकीय देयके, सेवानिवृत्त शिक्षकांच्या वेतन आयोगाचे हप्ते, वरिष्ठ वेतन श्रेणी फरक, तसेच इतर पुरवणी देयके अदा करता आलेली नव्हती.

सन २०२३-२४ या वर्षासाठी प्रलंबित असलेल्या शिक्षकांच्या पुरवणी देयकासाठी अनुदान उपलब्ध करून दिल्याने आता शिक्षकांची सर्व प्रकारची प्रलंबित पुरवणी देयके अदा होणार आहेत. यामध्ये सर्व देयके ही शालार्थ प्रणालीद्वारे आहारित करायची आहेत. सेवानिवृत्त शिक्षकांची ही बिलेदेखील शालार्थ वेतन प्रणालीद्वारे अदा करण्याची सुविधा देण्यात आली आहे.

सर्व प्रकारची पुरवणी देयके दि. १५ फेब्रुवारीपूर्वी वेतन शालार्थ प्रणालीमध्ये तयार होणे आवश्यक आहे. संबंधित शाळांकडून देयके सादर करण्याची जबाबदारी गटशिक्षणाधिकाऱ्यांवर राहील. शिक्षण उपसंचालकांनी यासाठी जिल्ह्यास ५८ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाल्याने आता शिक्षकांची सर्व प्रकारची पुरवणी देयके अदा होणार आहेत. त्यामुळे प्राथमिक शिक्षकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण होईल.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles